आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नदीत उतरला वीजप्रवाह; दाेन म्हशींचा मृत्यू, पाेहायला जाणारी मुले बचावली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - येथील वाघूर नदीच्या पात्रात उतरलेल्या दोन म्हशींचा तडफडून मृत्यू झाला. शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या एका विद्युत पंपात बिघाड झाल्याने संपूर्ण नदीच्या पाण्यातच विद्युत प्रवाह उतरला होता, हे म्हशी दगावल्यानंतर उघड झाले. या नदीत दररोज शेकडो मुले पोहण्याचा आनंद लुटतात. तथापि, सकाळी बोचरी थंडी जाणवू लागल्याने सकाळी १० पर्यंत नदीत कोणीच उतरले नव्हते. त्यामुळे मोठी मनुष्य हानी टळली.  ही घटना रविवारी (दि.१७) सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर लाइनमनच्या मदतीने विद्युत प्रवाह बंद करून मृत म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यात आले. म्हशी दगावल्याने आपले दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा म्हशीच्या मालकाने केला आहे. तथापि, या घटनेला जबाबदार कोण, कोण नुकसान भरपाई देणार, असे प्रश्नही म्हशीच्या मालकाने उपस्थित केले आहेत.  अजिंठा येथील तेलीपुरा गल्लीत राहणारे शेतकरी फेरोजखाँ इस्माईलखाँ यांच्याकडे दोन म्हशी होत्या. नेहमीप्रमाणे रविवारी त्यांचा मुलगा म्हशींना पाणी पाजण्यासाठी वाघूर नदीवर घेऊन गेला असता पाण्याला तोंड लागताच दोन्ही म्हशी तडफडू लागल्या. अवघ्या काही मिनिटांतच दोन्ही म्हशींचा पाण्यात तडफडून मृत्यू झाला. घटनेची माहिती  महावितरण कंपनीसह पोलिसांना देण्यात आल्याने महावितरण कंपनीचे लाइनमन जफर शेख, सुमित, शेख जाकीर यांनी विद्युत पुरवठा तत्काळ खंडित केला.  दरम्यान, एका मोटारीतील वीज प्रवाह पाण्यात उतरल्याचे वायरमन शेख जफर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. 

दुपारनंतर हाेते पाेहण्यासाठी गर्दी :


यंदा चांगला पाऊस झाल्याने वाघूर नदीला भरपूर पाणी अाले अाहे. यात दरराेज शेकडाे मुले पाेहण्याचा अानंद लुटतात. मात्र गेल्या चार दिवसांपासून बाेचरी थंडी जाणवू लागल्याने मुले सकाळऐवजी दुपारी  पाेहण्याचा अानंद लुटताहेत. महिलाही दुपारीच धुणे धुण्यासाठी नदीपात्रात जातात. अनेक मुले रविवारची सुटी पाेहण्याचा अानंद लुटून घालवतात. कदाचित म्हशी  नदीत गेल्या नसत्या तर काेणालाही  पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याचे लक्षात अाले नसते. परिणामी माेठी जीविताची हानी झाली असती. 

नुकसानभरपाई मिळावी :


सुदैवाने म्हशींमागे असलेल्या माझा १४ वर्षीय मुलाने समयसूचकता ओळखत माघारी फिरल्याने तो बचावला. मात्र आधीच पाण्यात मक्का वाहून गेल्याने व आता सुमारे दोन ते तीन लाख रुपये किमतीच्या दोन म्हशी दगावल्याने मोठा आर्थिक फटका बसला असून तत्काळ संबंधित विभागाकडून  नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी फेराेजखा यांनी केली अाहे. दरम्यान घटनास्थळाचा पंचनामा सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली हेमराज मिरी यांनी केला.

नदीपात्रात साेडल्या पन्नास मोटारी :


शेतीतील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळपास ५० ‘जलपरी’ विद्युत पंप पाण्यात सोडलेले आहेत. यातील काही पंपांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्याने वरील घटना घडल्याची चर्चा ग्रामस्थांत हाेत आहे.