आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG! चीनच्या या कृत्रिम चंद्रामुळे होणार 1200 कोटींची विजबचत, लाईट लावायची गरजच नाही...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- चीनने आता विज वाचवण्यासाठी त्यांच्या शहरातील स्ट्रीट लाइट बंद करुन त्याऐवजी एक नामी उपाय शोधुन काढला आहे. चीन एक कृत्रिम चंद्र लाँच करण्याच्या तयारीत आहे. चीनने दावा केल्यानुसार, या चमकणाऱ्या उपग्रहापासुन शहराच्या 80 किलोमीटर परिसरात उजेड राहणार आहे. या कृत्रिम चंद्रापासुन वर्षाला 17.2 कोटी डॉलर म्हणजेच जवळपास 1200 कोटींची विचबचत होऊ शकते. चीन हा कृत्रिम चंद्र 2020 ते 2022 पर्यंत लाँच करणार आहे. हा प्रोजेक्ट चेंगदु एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी मायक्रोइलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम रिसर्च इंस्टीट्युट कॉर्पोरेशन डेव्हलप करत आहे.

 

चंद्रापेक्षा 8 पटअधिक जास्त प्रकाश देईल कृत्रिम चंद्र

हा कृत्रिम चंद्र सुर्यमालेतील चंद्रापेक्षा 8 पटीने जास्त प्रकाशमान असणार आहे. हा कृत्रिम चंद्र चीनच्या रस्त्यांना प्रकाश देईल. या कृत्रिम चंद्रापासुन पर्यावरणावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होऊ शकतो परंतु चीनने दावा केला आहे की, याचा प्रकाश आणि तिव्रतेला अॅडजेस्ट करता येणार असल्याने प्रकाशालाही कंट्रोल करणे शक्य आहे. हा कृत्रिम चंद्र आकाशात फिरेल तेव्हा तो एका चमकणाऱ्या ताऱ्यासारखाच दिसेल. या कृत्रिम चंद्रामुळे पर्यावरणाला आणि मनुष्याला कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचा दावा चीनने केला आहे.

 

पुढील स्लाइडवर वाचा- जमिनीपासुन ५०० किलोमीटर उंचीवर असेल हा कृत्रिम चंद्र

 

बातम्या आणखी आहेत...