आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने आरोग्य सेविकांना दिले अश्लील व्हिडिओ असलेले फोन 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिक व मालेगाव महापालिकेच्या अारोग्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या नव्या कोऱ्या स्मार्टफोनमध्ये अश्लील चित्रफिती आणि छायाचित्रे आढळून आली.  विशेष म्हणजे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हा प्रकार उघडकीस आला. तांत्रिक गफलतीचे कारण देत या महिलांना दिलेले मोबाइल परत घेण्यात आले. मात्र, महिला कर्मचारी व कुटंुबीयांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून चौकशीची मागणी होत आहे.


केंद्र शासनाने ईव्हीन (इलेक्ट्रिक व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क) संदर्भातील विशेष अॅप विकसित केले आहे. शीत साखळी हाताळणाऱ्या (व्हॅक्सीन कोल्ड चेन हँडलर) कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध लसींची संख्या, शिल्लक लसेस यांची माहिती त्या अॅपवर अपलोड करावयाची आहे. या उपक्रमासाठी लसीकरण हाताळणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. नाशिक व मालेगाव क्षेत्रातील आरोग्य सेवकांना एका हॉटेलमध्ये बुधवारपासून हे प्रशिक्षण दिले जात होते. त्यात ३५ ते ४० फार्मसिस्ट, आरोग्य सेविका, परिचारिकांचा सहभाग होता. त्यांना सरकारने दिलेल्या स्मार्टफोनमध्ये  ईव्हीन अॅप डाऊनलोड करून त्यावर माहिती कशी अपलोड करावी, याबाबत प्रशिक्षण सुरू असतानाच मोबाइलमध्ये ३० ते ३५ अश्लील चित्रफिती व छायाचित्रे आढळून आली. वाच्यता होताच प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी लागलीच सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या संपूर्ण प्रकाराने आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर अाला.  


कर्मचाऱ्यांकडून मनधरणी
तांत्रिक बाब असल्याचे सांगत प्रशिक्षण अधिकाऱ्यांनी सर्व मोबाइल जमा केले गेले. या प्रकाराची बाहेर वाच्यता न करण्यासाठी मनधरणीही सुरू होती. “हा प्रकार वरिष्ठांना कळवण्यात आले आहे, ‘असे प्रशिक्षण अधिकारी नितीन गुर्जर यांनी सांगितले.


हे प्रश्न अनुत्तरितच.....
२०१५ पासूनचे छायाचित्रे, व्हिडिओ असल्याने हे मोबाइल नवीन आहेत का तसेच प्रशिक्षणापूर्वी अधिकाऱ्यांनी  तपासणी केली नाही का, असे प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहेत. त्यावर विभागाकडून काहीच माहिती देण्यात आली नाही.  

बातम्या आणखी आहेत...