आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नियासा जंगलातील हत्तींची शिकार करणाऱ्याला होणार 16 वर्षांची शिक्षा, तीन वर्षात 1 लाख हत्तींची शिकार झाल्यामुळे वाढवली सुरक्षा

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मालावी- अफ्रिकेतील सर्वात मोठ्या नियासा जंगलामध्ये काही वर्षांपासून हत्तीची मोठ्या प्रमाणात शिकार होत असल्यामुळे प्रशासनाने जंगलाची सुरक्षा वाढवली आहे. त्यामुळे मागील एक वर्षांपासून येथील एकाही हत्तीची शिकार झालेली नाही. मोजांबिकच्या उत्तर भागात असणारे हे जंगल क्षेत्रफळाच्या दृष्टीने स्वित्झरलंडपेक्षाही मोठे आहे. प्रशासनाला आलेले हे यश खूप महत्वाचे आहे, कारण, 2010-12 दरम्यान अफ्रिकेमध्ये एक लाखांपेक्षा अधिक हत्ती शिकाऱ्याद्वारे ठार करण्यात आले होते. 

 

हे शिकारी मुख्यतः दातांसाठी वयस्कर असणाऱ्या हत्तींची शिकार करतात. पण 17 मे 2018 नंतर या क्षेत्रामध्ये वाढलेल्या सुरक्षेमुळे हत्तींच्या शिकारीला आळा बसला आहे. तसेच, या सर्व क्षेत्रामध्ये हवेतून आणि जमिनीवरून सुरक्षा वाढवून सुरक्षा दलांना विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 

 

बंदुक आढळल्यास 16 वर्षांची कैदसुरक्षा दलाला संशयावरून कोणालाही अटक करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे आरोपीवर 72 तासांच्या आत खटला दाखल करून वकिलाकडे सोपवले जाईल. पण जंगलामध्ये कोणी बंदुक घेऊन आढळल्यास असे समजले जाईल की, तो शिकारीसाठी जंगलात आला होता. त्यामुळे आरोपीला 16 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 

 

या परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी न्यूयॉर्कच्या वन्य जीव संरक्षण संस्थेकडे सोपवण्यात आली आहे. ही संस्था शासनाच्या मदतीने या संपूर्ण परिसराची देखरेख करते. तसेच, संस्थेचे संचालक जेम्स बाम्पटन यांनी सांगितले की, मागील एका वर्षापासून एकाही हत्तीची शिकार न होणे हे आमच्यासाठी खूप मोठे यश आहे. पण हत्तींची संख्या वाढण्यास अनेक वर्ष लागतील.

 

जेम्सनुसार, मोजांबिकच्या राष्ट्राध्यक्षांच्या राजकीय इच्छाशक्तीमुळे हत्तींच्या शिकारीवर प्रतिबंध लावणे शक्य झाले. सध्या या क्षेत्रात जवळपास 4000 हत्ती शिल्लक राहिले आहेत. पण एकावर्षापूर्वी हत्तींची संख्या फक्त दोन हजार एवढीच होती, असा त्यांचा अंदाज होता.

0