Home | Khabrein Jara Hat Ke | Elf Creature Spotted in Night Video Creeps Out Harry Potter Fans in US

सीसीटीव्हीत कैद झाला हॅरी पॉटर चित्रपटातील 'एल्फ', 3 कोटींपेक्षा अधिक लोकांनी पाहिला व्हिडिओ

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 12, 2019, 01:17 PM IST

गोमेज नावाच्या व्यक्तीने विचित्र दिसणाऱ्या या प्राण्याचा व्हिडिओ शेअर केला होता

  • कोलोराडो(अमेरिका)- येथील रहिवासी असणारी व्हिविअन गोमेज यांना आपल्या सिक्यूरिटी कॅमेरामध्ये हॅरी पॉटर चित्रपटातील व्यक्तीरेखा असणाऱ्या एल्फसारखा एक प्राणी दिसला. त्यामुळे सोशल मीडियावर याचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ सुमारे तीन कोटी लोकांनी बघितला आहे.


    गोमेजने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, रविवारी सकाळी उठल्यानंतर आपल्या कॅमेऱ्यामध्ये विचित्र सावली बघितल्यामुळे तिला आश्चर्याचा धक्काच बसला. या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी तीने घरातील दुसऱ्या ठिकाणी लावलेल्या कॅमेऱ्याची तपासणी केली असता, त्यामध्ये काहीही रेकॉर्ड झालेले नव्हते. " फेसबुकवर हा व्हिडिओ 90 लाख वेळेस पाहण्यात आला आहे. तसेच, हजारो लोकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामुळे ट्विटरवर याला रिपोस्ट केले गेले असता, सुमारे 3 कोटी वेळेस हा व्हिडिओ पाहण्यात आला.

    फेक असल्याचा दावा
    महिलेने शेअर केलेल्या या व्हिडिओवर लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी याची एल्फसोबत तर कोणी गोबलिनसोबत तुलना केली आहे. तसेच, एका युझरने लिहिले की, जर आपण निरिक्षण करून पाहिले तर हे लहान मुलासारखे दिसत असून, त्याने डोक्यावर शॉर्ट्स घातले आहेत. तर काहींनी तर हे एक प्रँक असल्याचे म्हटले आहे.

  • Elf Creature Spotted in Night Video Creeps Out Harry Potter Fans in US
  • Elf Creature Spotted in Night Video Creeps Out Harry Potter Fans in US

Trending