आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आयकॉनिक’मुळे पालटणार वेरूळसह अजिंठ्याचे रूप; केंद्रीय अर्थसंकल्पात केली तब्बल ३०० कोटींची तरतूद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील महत्वाच्या १७ आयकॉनिक डेस्टिनेशन स्थळांचा कायापालट करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली असून यात जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ-अजिंठा लेण्यांच्या विकासासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली. त्यामुळे दोन वर्षात या स्थळांचे रूप पालटू शकते. आयकॉनिक डेस्टिनेशन हा केंद्राचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यावर थेट पंतप्रधान कार्यालयाची नजर आहे. दरम्यान, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या तरतुदीबद्दल केंद्राचे आभार मानले. 


काय हवे आयकॉनिकमध्ये? 
अजिंठा-वेरूळपर्यंत जाण्यासाठी उत्तम रस्ते, स्वच्छतागृह, लेणीवर पर्यटकांना काही काळ बसण्यासाठी बैठक व्यवस्था, सायकल ट्रॅक, संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, लोककलांचे सादरीकरण, अपंगांसाठी विशेष सुविधा, जास्तीत जास्त शहरांशी हवाई जोडणी आणि हेलिपॅड हवे, अशा अपेक्षा पर्यटक व्यावसायिकांनी व्यक्त केल्या.
 

अशी आहे ‘आयकॉनिक साइट’
> खासगी एजन्सीमार्फत गॅप अनॉलिसिस करून डीपीआर तयार केला जाईल. 
>  स्टेक होल्डर्सशी चर्चा होऊन प्रत्यक्ष डीपीआरच्या कामाला सुरुवात होईल.
 यासाठी नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजनेतून (हृदय) निधी उपलब्ध करून दिला जाईल.
>  या ठिकाणी पायाभूत सुविधांचा विकास, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटकांना आकर्षित केले जाणार आहे.
>  यासाठी खासगी समूहांचे सहकार्य घेऊन या स्थळांचे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले जाईल. 

 

लेण्यांमध्ये सेवा पुरवण्यासाठी...
आयकॉनिक डेस्टिनेशन ही खरे तर गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेली योजना आहे. यंदा त्यासाठी आर्थिक तरतूद देण्यात आली आहे. आम्ही या योजनेअंतर्गत लेणीमध्ये चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी काम करतोय. 
-प्रणब सरकार, सचिव, आयएटीओ, दिल्ली

 

विकास होणार
आयकॉनिक डेस्टिनेशनमुळे वेरूळ-अजिंठा लेणीचा विकास होण्यास मदत होणार अाहे. सीएसआरच्या माध्यमातून या स्थळांवर सुविधा पुरवल्या जातील. यामुळे निधीअभावी सुविधा नाहीत असे पुरातत्त्व खात्याला म्हणता येणार नाही. 
-जसवंतसिंग, अध्यक्ष, टुरिझम प्रमोटर्स गिल्ड

बातम्या आणखी आहेत...