Home | International | Other Country | Emanuel Macron 'disappears' in 278 people in Paris

पॅरिसमध्ये 278 जण ताब्यात इमॅन्युएल मॅक्रॉन ‘बेपत्ता’

वृत्तसंस्था | Update - Dec 09, 2018, 08:54 AM IST

फ्रान्समध्ये मॅक्रॉन सरकारच्या विरोधात २२ व्या दिवशी निदर्शने

  • Emanuel Macron 'disappears' in 278 people in Paris

    पॅरिस- फ्रान्समधील सरकारविरोधी आंदोलन चिघळण्याची शक्यता असून सलग तिसऱ्या आठवड्यातही शेकडो संतप्त लोक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. देशात विद्यार्थ्यांच्या आंदोलनालाही सुरुवात झाली आहे. आंदोलनाने पुन्हा हिंसक वळण घेऊ नये म्हणून पोलिसांनी २७८ जणांना ताब्यात घेतले. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचाही मारा केला. राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन मात्र कोठेही दिसत नाहीत.

    यलो व्हेस्टच्या आंदोलकांनी अनेक रस्ते अडवले होते. अनेक ठिकाणी आंदोलकांनी पिवळ्या रंगाचे जॅकेट घालून राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. गेल्या शनिवारी पॅरिसमध्ये अत्यंत स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. त्याची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेण्यात आली होती. शनिवारी पॅरिसमध्ये ८ हजारावर जवान तैनात होते.

    निर्णय अन्यायकारक
    अर्थव्यवस्थेला जागतिक दर्जा देण्यासाठी मॅक्रॉन यांनी काही पावले उचलली आहेत. त्यास सरकारने सुधारणावादी असे संबोधले असले तरी जनतेने मात्र हा निर्णय अन्यायकारक असल्याची टीका केली आहे.

Trending