आंतरराष्ट्रीय / धावत्या कार असलेल्या रस्त्यावर विमानाचे आपत्कालीन लँडिग

विमानाच्या इंधन यंत्रणेत काही बिघाड झाला होता. यामुळे धावत्या कार सुरू असताना, विमान उतरवावे लागले

Sep 19,2019 12:28:00 PM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेतील वॉशिंग्टनच्या पियर्स काउंटी येथे गुरुवारी रस्त्यावरून कार धावत असलेल्या ठिकाणी विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. केआर-२ विमानाच्या इंधन यंत्रणेत काही बिघाड झाला होता. यामुळे धावत्या कार सुरू असताना, विमान उतरवावे लागले. या अपघातात कोणी जखमी झाले नाही. हे सिंगल प्रॉपेलर विमान होते. घटनेनंतर पायलट व एका सैन्य दलाच्या अधिकाऱ्याने रस्त्याच्या कडेला नेले.

X