आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात VIP कस्टमरसाठी हवाईसुंदरींना काय-काय करावे लागते! एअरहोस्टेसनेच केला खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- फ्लाइटमध्ये एअरहोस्टेस व्हीआयपी प्रवाशांना सेवा देण्यासाठी अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टींची सुद्धा तयारी करतात. एअरहोस्टेस आपल्या लिपस्टिकच्या रंगापासून नेलपॉलिशच्या रंगापर्यंत सर्वच गोष्टींची काळजी घेतात. एवढेच नाही, तर त्यांना व्हीआयपी प्रवाशांच्या आवडी-निवडीवरही विशेष लक्ष द्यावे लागते. एमिरेट्समध्ये काम करणाऱ्या एअरहोस्टेसने सांगितले, की व्हीआयपी प्रवाशांसाठी त्यांना अनेक प्रकारची सीक्रेट तयारी करावी लागते.

 

एअरलाइन्स इंडस्ट्रीमध्ये एमिरेट्सच्या एयरहोस्टेसला सर्वात ग्लॅमरस हवाईसुंदरी मानले जाते. या एअरहोस्टेस त्यांच्या ओठांना टोपीच्या लाल रंगाप्रमाणे हॉट रेड लिपस्टिकची शेड लावतात. याशिवाय आय-लायनर आणि स्मितहास्य त्यांच्या मेकअपचाच एक भाग असतो. व्हीआयपी कस्टमरसोबत डील करण्यासाठी त्यांना लिपस्टिकच्या रंगापासून सॅन्डलपर्यंतची काळजी घ्यावी लागते. या हवाईसुंदरींना एअरलाइन कंपनीच्या सर्व नियमांचे पालन करावे लागते.

 

मेकअप परफेक्ट असणे आवश्यक

एमिरेट्समध्ये एअरहोस्टेसचा मेकअप, हेअरस्टाइल आणि सॅन्डल या सर्वांसाठी कठोर नियम असतात त्यांना ते पाळावेच लागतात. या हवाई सुंदरींना कंपनीच्या ग्रूमिंग डिपार्टमेंटने ठरवून दिलेल्या लिपस्टिकच्या शेड लावण्याची परवानगी असते. याशिवाय त्या फ्रेंच मॅनिक्योरसुद्धा करु शकतात.  


पुढच्या स्लाइडवर वाचा-  कशाप्रकारची तयारी करतात एअरहोस्टेस...

बातम्या आणखी आहेत...