आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Emma Watson, Who Became Superstar At The Age Of 11, Was Auditioned Eight Times For The Role Of 'Hermione'

11 वर्षांच्या वयातच सुपरस्टार बनली होती एम्मा वॉटसन, 'हरमॉइनी' च्या भूमिकेसाठी आठ वेळा दिले होते ऑडिशन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : हॅरी पॉटरमध्ये एम्मा वॉटसन हिने हॅरीची बेस्ट फ्रेंड आणि समजूतदार विद्यार्थिनीचे काम केले होते. चित्रपटातच नाही तर खऱ्या जीवनातही तिला सर्वात जास्त महत्त्व शिक्षणाचे वाटते. फिल्मी करिअरमध्ये व्यस्त असूनही तिने शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही उलट जास्तच लक्ष दिले.

एम्माने फार कमी वयात स्वत:तील गुण ओळखले होते आणि ती ते साध्य करण्यासाठी मेहनत करत गेली. शेवटची तिला एक मोठी संधी मिळाली. आपल्यातील गुणांचा वापर करून तिने या संधीचे सोने केले. परिणाम हा झाला की, जगातील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये तिची गणना होते.

एम्मा वॉटसनचा जन्म फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये १५ एप्रिल १९९० रोजी झाला. आईवडील दोघेही वकिली करत होते. एम्मा पाच वर्षंाची असतानाच आईवडील विभक्त झाले आणि आई तिला व तिच्या भावाला घेऊन इंग्लंडला गेली. पण विकेंडला एम्मा आपल्या वडिलांना भेटायला जात असे. केवळ सहाव्या वर्षीच एम्माला अभिनयात रूची निर्माण झाली. तिने ही आवड गांभीर्याने घेतली. तिने यासाठी एका थिएटर स्कूलमध्येही प्रवेश घेतला. उरलेल्या वेळेत तिने अभिनय शिकण्यास सुरुवात केली. एम्मा वयाच्या सातव्या वर्षात असताना तिने एका कविता स्पर्धेत भाग घेतला आणि तिने इतक्या सहज आणि सरळपणे आपली कविता सादर केली की, तिने ही स्पर्धा सहजपणे जिंकली.

तिने अनेक नाटकांमध्ये चांगला अभिनय केला आहे. ज्या थिएटरमध्ये ती अभिनय शिकत व करत होती, एक दिवस तेथील टीचरने तिला सांंगितले की, बेस्ट सेलिंग कादंबरी हॅरी पॉटरचे पहिले पुस्तक 'हॅरी पॉटर अँड द फिलॉसफर्स स्टोन' वर चित्रपट बनत आहे. यात एम्माच्या वयाच्या मुलीच्या पात्राचा शोध चालू आहे. यानंतर ऑडिशन घेणाऱ्या लोकांशी एम्माचा परिचय करून दिला. या भूमिकेसाठी एम्माची आठवेळा ऑडिशन झाली. पुस्तकाची लेखिका जेके रोलिंगही चित्रपटात पूर्ण वेळ सक्रिय होती. तिलाही आपल्या पुस्तकावर निघणाऱ्या चित्रपटासाठी योग्य मुलगी पाहिजे होती. हरमॉइनीच्या भूमिकेसाठी लेखिकेने पहिल्याच स्क्रीन टेस्टमध्येच एम्माला पसंत केले होते. अनेकदा रिजेक्ट झाल्यानंतरही ही भूमिका आपल्याकडे ठेवण्यात तिला यश आले.


नोव्हेंबर २००१ मध्ये चित्रपट रिलीज झाला आणि सुपरहिट झाला. चित्रपटाला तीन अकादमी अवॉर्डसाठी नामांकन मिळाले होते. अशा प्रकारे वयाच्या केवळ अकराव्या वर्षीच एम्मा सुपरस्टार झाली.

तिने हॅरी पॉटर सिरीजच्या बाकीच्या सर्व सिरीजमध्येही कामे केली. थेाडे वय वाढल्यानंतर तिने या इमेजमधून स्वत:ला बाहेर काढू इच्छित होती. यासाठी २००७ साली तिने 'बॅले शूज' या चित्रपटात मुख्य भूमिका केली. चित्रीकरणात व्यस्त राहूनही ती रोज पाच तास अभ्यास करत असे. हायस्कूल परीक्षेत तिने मेहनतीने चांगले गुण मिळविले होते. २०१४ साली तिने आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. हॅरी पॉटर सिरीज संपल्यानंतर तिने अनेक चित्रपट केले, त्यात 'ब्युटी अँड द बीस्ट' चित्रपट सर्वात यशस्वी ठरला. आपल्या फॅशनसाठीही एमा बरीच प्रसिद्ध आहे. ती मॉडेलिंगही करते आणि सोशल वर्करही आहे. ती सध्या जागोजागी जाऊन महिलांच्या अधिकारांबद्दल जनगजागरण करीत असते. २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांची महिलांसाठी सदिच्छा दूत म्हणूनही काम केले. शिक्षणाच्या समान अधिकारसाठीही ती काम करते.

जीवनापासून मिळालेली शिकवण

- पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा जास्त महत्त्व शिक्षणाचे असते.
- तुमचे कोणी ऐको किंवा ना ऐको, तुमचा ज्यावर विश्वास आहे तेच करा. जे सुरू केले आहे ते संपविलेही पाहिजे.