आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल दोन पिढ्यांनंतर या कुटुंबात जन्माला आली लेक! लग्न मंडपासारखे सजवले घर, रिसिव्ह करण्यासाठी फुलांची गाडी; असे झाले Celebration

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मुलगी जन्माला येण्याचा आनंद काय असतो हे आज मध्य प्रदेशच्या गुना येथे राहणाऱ्या या नागवंशी परिवाराशिवाय दुसरे कुणी सांगू शकणार नाही. त्यांच्या घरात गेल्या दोन पिढ्यांपासून मुलगीच नव्हती. तान्ह्या मुलीला हातात घेण्यासाठी या कुटुंबातील अबाल वृद्ध तरसले होते. अखेर मंगळवारी ईश्वराने त्यांची प्रार्थना ऐकली आणि एक गोड बातमी समोर आली. त्यांच्या घरात मुलगी जन्माला आली. या मुलीच्या जन्मावर काय चिमुकले आणि काय आजी आजोबा सगळ्यांनी एकच जल्लोष साजरा केला. जणु यांच्या घरी दिवाळी जरा लवकरच आली. आई-बाबा, काका-काकू आणि आजी आजोबांसह डझनभर भावंडांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. 


परीला फुलांनी सजलेल्या कारमध्ये रिसीव्ह करण्यासाठी गेले मोठे बाबा
> मुलीचे वडील भूपेंद्र सिंह अग्निवंशी यांनी सांगितल्याप्रमाणे, संपूर्ण परिवाराने मिळून या मुलीचे नाव परी असे ठेवले आहे. गेल्या दोन पिढ्यांपासून आमचे हात मुलीला घेण्यासाठी तरसले होते. आमच्या आई-वडिलांना चारही मुलेच झाली. भावांचे लग्न झाले. त्यांनाही फक्त मुलेच आहेत. मोठ्या भावांना सुद्धा मुलगीच हवी होती. त्यांचा आदर ठेवून मी रुग्णालयात मुलीला रिसीव्ह करण्यासाठी तिच्या मोठ्या बाबांनाच पाठवले आहे. 
> मोठ्या बाबांनी आपल्या हातांनी घरातील बोलेरे कार फुलांनी सजवली होती. घरातही परीच्या स्वागतासाठी संपूर्ण कुटुंबाने मिळून सजावट केली. मोठे बाबा जेव्हा मुलीला घरी घेऊन आले तेव्हा वडिलांसह समस्त कुटुंबीय पहिल्या मजल्याच्या गॅलरीत फुले आणि हार घेऊन थांबले होते. 


आमच्या घरात लग्न समारंभ नव्हे, मुलगी झाली...
मुलीचा घरात प्रवेश होणार तेवढ्यात सर्वांनी तिच्यावर फुलांचा वर्षाव केला. यावेळी घरातील तिचे चिमुकले भाऊ फटाके फोडून उत्साह साजरा करत होते. नागवंशी घरातील एकूणच वातावरण पाहून दिवाळी थोडीशी लवकरच आली असे वाटत होते. आसपासच्या लोकांना काही कल्पना नसल्याने काहींनी घरात लग्न वगैरे आहे की काय अशी विचारणा केली. त्यावर या कुटुंबियांनी हसतमुखाने आमच्या घरात मुलगी झाली असे उत्तर दिले. नागवंशी कुटुंबियांचा आदर्श खरोखर सर्वांनी घेण्यासारखा आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...