आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेने आयोजित केला होता Prison Tour; विद्यार्थ्याला अचानक कैद्यांमध्ये दिसले वडील, सगळेच झाले भावूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकॉक - थायलंडच्या एका समाजसेवकाने फेसबुकवर शेअर केलेली बाप-लेकाची स्टोरी सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी आरोम खुनमूंग असे त्यांचे नाव असून ते असे त्यांचे नाव असून ते जॅम बॅनज्यूड रेयाँग नावाच्या संस्थेसाठी काम करतात. समाज सुधारणेच्या निमित्ताने त्यांची संस्था शाळा, महाविद्यालये आणि कंपन्यांचे प्रिझन टूर आयोजित करते. अशाच एका शाळेतील विद्यार्थ्यांचा तुरुंगात दौरा सुरू होता. त्यावेळी जे घडले ते पाहून तेथे उपस्थित सर्वांचे डोळे पाणावले. 


तुरुंगात वडिलांना पाहिले तेव्हा...
आरोम यांनी सांगितल्याप्रमाणे, गेल्या आठवड्यात त्यांनी प्रिझन टूरसाठी आणलेल्या विद्यार्थ्यांना तुरुंगातील कैद्यांच्या राहणीमानाची माहिती देण्यास सुरुवात केली होती. विद्यार्थ्यांना समोरच्या खोल्यांमध्ये काही कैदी दिसून आले. त्या कैद्यांना पाहून त्यातील एका विद्यार्थ्याने अचानक रडण्यास सुरुवात केली. कैद्यांकडे पाहिले असता एक कैदी सुद्धा त्या मुलाला पाहून रडत होता. जवळ जाऊन विचारले असता त्या मुलाने हळूच ते आपले वडील आहेत असे सांगितले. आरोम यांनी वडिलांना बोलायचे आहे का असे विचारले असता त्याने वेळीच होकार दिला. तुरुंग प्रशासनाच्या परवानगीनंतर त्या कैद्याला बाहेर सोडण्यात आले. यानंतर दोघांनी धावून जात एकमेकांची घट्ट गळाभेट घेतली आणि खूप रडले. त्यांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांचे डोळे पाणावले होते. 


बेटा, मला पाहून लाज वाटत असेल ना रे...
कैदेत असलेल्या वडिलांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा मुलाचे मित्र थांबले होते. वडिलांनी वेळीच मुलाला विचारले. "बेटा, तू मित्रांसोबत आलास मला पाहून तुला लाज वाटत असेल ना रे? मी तुझी शपथ घेतो तुरुंगातून सुटल्यानंतर कधीच वाइट वागणार नाही. एक चांगला नागरिक होऊन दाखवेल. मी तुझ्यासाठी एक दिवस बाहेर येऊन चांगला माणूस होईन." वडिलांचे हे बोलणे ऐकूण मुलगा पुन्हा रडला आणि आपल्या बापाच्या पायांवर पडून आशीर्वाद घेतला. "तुम्ही माझे वडील आहात. तुम्हाला पाहून मला लाज कशी वाटेल." यानंतर "मला माफ कर बेटा" असे म्हणत वडिलांनी मुलाला आणखी घट्ट मिठी दिली आणि कधीच वाइट वागणार नाही असे आश्वासन दिले. त्या व्यक्तीला कोणत्या गुन्ह्यासाठी कैदेत ठेवण्यात आले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. तरीही कुठलाही गुन्हा करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीय किंवा किमान मुलांचा विचार करावा असे आवाहन टूर आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...