Bollywood / इमोशनल : शोनाली बोसने मुलगा ईशानच्या पुण्यतिथीवर लिहिली पोस्ट, 'तुझ्या मृत्यूने मला खूप काही शिकवले' 

एका घटनेत झाला होता ईशानचा मृत्यू

Sep 14,2019 01:54:00 PM IST

बॉलिवूड डेस्क : प्रियांका चोप्राचा चित्रपट 'द स्काय इज पिंक' मोटिव्हेशनल स्पीकर आयेशा चौधरीच्या कथेवर आधारित आहे. हा चित्रपट डायरेक्टर शोनाली बोसच्या मनाच्या खूप जवळ आहे. आता त्यांनी इंस्टाग्रामवर आपला मुलगा इशानच्या फोटोसोबत एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने चित्रपट बनवण्यामागचा उद्द्येश देखील सांगितला आहे.


शोनालीने मुलाच्या आठवणीत शेअर केली पोस्ट...
शोनालीने लिहिले आहे, "माझे हृदय, माझा इशु, आज तुझी 9 वी पुण्यतिथी आहे. मी टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'द स्काय इज पिंक' साठी गेले होते. तिथे मी मृत्यूबद्दल खूप काही बोलले. तेदेखील जे तू मला तुझ्या अंत्यसंस्काराच्या दिवसापासून शिकवले आहेस. कसे तू मला जागवले, माझ्यावर सतत दृष्टी ठेवण्यासाठी आणि आपला हात माझ्या हातात ठेवण्यासाठी तुझे खूप आभार. महत्वपूर्ण क्षणांना गरज असते तेव्हा तू नेहमी येतोस. यावेळी तू गिफ्टमधे मला वर्ल्ड प्रीमियर दिले आहे. मला माहित आहे की, याला शुभेच देशील आणि तेव्हा रूममध्ये प्रेम, प्रकाश आणि एक ऊर्जा असेल. तुझी ऊर्जा. आयेशाची ऊर्जा. आईची ऊर्जा. 2,000 लोक, मी अजूनही घाबरलेली आहे आणि उत्साहितदेखील आहे. 9 व्या पुण्यतिथीला तुझी खूप आठवण येते आहे. तुला प्रेम, तुझी आई."


एका घटनेत झाला होता ईशानचा मृत्यू...
शोनाली यांचा मुलगा ईशान लॉस एंजेलिसमध्ये शिकत होता. ईशानच्या इलेक्ट्रिक रेजरने स्पार्क निघाल्यामुळे रूममध्ये आग लागली. ज्यामध्ये वैतपद्धतीने जळल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. शोनालीने रेजर कंपनीवर केस केली होती. पण कंपनी म्हणाली की, त्यांच्या प्रोडक्टमध्ये काहीही खराबी नव्हती. ईशानने नशेत स्वतःला आग लावून घेतली. सोबतच हेदेखील सांगितले गेले की, त्याच्या मृत्यूनंतर त्यांचे आयुष्य चांगले होईल कारण त्यांना मुलाच्या शाळेची फीस द्यावी लागणार नाही. शेवटी रेजर कंपनीने ही केस जिंकली होती.

X