आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
तिरुअनंतपुरम - शतकातील सर्वात महाप्रलंयकारी पुराने पीडित केरळ राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. तथापि, अजूनही बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. यादरम्यान असेही काही चेहरे समोर आले, ज्यांची मदत एखाद्या आदर्शापेक्षा कमी नाही. तामिळनाडूची 9 वर्षांची अनुप्रिया नवी सायकल घेण्यासाठी पैसे जमा करत होती. परंतु केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिने 4 वर्षांत जमा केलेले 9 हजार दान दिले. दुसरीकडे, केरळ सरकारने मच्छीमारांना बचाव कार्यात जोडण्यासाठी अपील केली. त्याला सांगण्यात आले की, तुमच्या टीमच्या प्रत्येक सदस्याला 3-3 हजार रुपये दिले जातील. मच्छीमारांनी हे बक्षीस नाकारले.
चिमुरडीने दररोज 5-5 रुपये जमा केले:
फिझुपुरमची अनुप्रिया सायकलसाठी दररोज 5-5 रुपये जोडत होती. तिला केरळच्या परिस्थितीची माहिती मिळाल्यावर तिने तिच्या 5 पिगी बँकमध्ये जमा केलेले सर्व पैसे दान करण्याचा निर्णय घेतला. पाचही पिगी बँक तोडल्यानंतर 9 हजार रुपये निघाले, ते तिने मुख्यमंत्री मदतनिधीत जमा केले.
मच्छीमार म्हणाले- जीव वाचवण्याचा आनंद आणखी कशात नाही:
कोच्चीमध्ये मच्छीमारांच्या टीमने अनेकांचा जीव वाचवला. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी या टीमचे कौतुक करून प्रत्येक सदस्याला 3-3 हजार रुपये देण्याची घोषणा केली. परंतु टीमचे सदस्य खैस मोहम्मद म्हणाले- मी आणि माझे साथीदार मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कौतुकामुळे खूप आनंदित आहोत. आम्हाला कोणताही मेहनताना नकोय. लोकांचा जीव वाचवण्याचा आनंद आणखी कशातही नाही.
आई म्हणाली- एशियाडमध्ये मेडल जिंकून ये, आमची काळजी नको करूस:
पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी एम. श्रीशंकर (19) लांब उडीचे खेळाडू आहेत. ते पहिल्यांदा एशियाडमध्ये भाग घेत आहेत. त्यांचे आजोबा, काका आणि काकू इडुक्कीमध्ये राहतात, जेथे प्रचंड पूर आलेला आहे. हे तिन्ही नातेवाईक बेपत्ता आहेत, परंतु श्रीशंकरची आई म्हणाली- सगळे काही ठीक होईल. तू आपल्या खेळावर लक्ष केंद्रित कर आणि मेडल जिंकून ये. श्रीशंकर क्वॉलिफाइंग राउंडमध्ये 28 ऑगस्ट रोजी भाग घेतील. त्यांचे वडील एस. मुरली आंतरराष्ट्रीय ट्रिपल जंपर राहिलेले आहेत. त्यांच्या आई के. एस. बिजिमोल 800 मीटर कॅटेगिरीत आंतरराष्ट्रीय धावपटू राहिलेल्या आहेत.
सरकारी अधिकाऱ्यांनीही केली मदत:
केरळच्या पूरग्रस्तांसाठी वेगवेगळ्या राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांनीही पाऊल उचलले आहे. आंध्र प्रदेशच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री मदतनिधीही 20 कोटी रुपये पाठवले आहेत. दुसरीकडे, राजस्थान, तामिळनाडू आणि केरळच्या आयपीएस-पीसीएस अधिकाऱ्यांनी एका दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले आहे. याशिवाय फेसबुकने मदतीसाठी 1.75 कोटी रुपये पाठवले आहेत.
राज्यात पूर, मंत्री विदेशात :
केरळ सध्या महापुराशी संघर्ष करत आहे आणि वनमंत्री जर्मनीत आहेत. यामुळे सीपीआयने त्यांना ताबडतोब परतण्याचे निर्देश दिले आहेत. कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव कनम राजेंद्रन म्हणाले की, पक्षाला राजू यांच्या सहलीबाबत जास्त माहिती नव्हती. सूत्रांनुसार, मंत्री राजू यांच्यावर पक्ष कडक कारवाई करू शकतो.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.