आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमृतसर अपघात: काळा टीका लावून आईने केले दीड वर्षांच्या मुलाला दफन; मृतदेहाशेजारी ठेवले चॉकलेट, बिस्कीट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर - दसऱ्याच्या संध्याकाळी घडलेल्या रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पावलेल्यांमध्ये दीड वर्षांच्या शिवमसह त्याच्या वडिलांचा देखील समावेश होता. शिवमची आई आरतीने आपल्या पतीचे अंतिम संस्कार आटोपले आणि हातात दीड वर्षांचे बाळ घेऊन त्याला दफन करण्यासाठी मोहकमपुरा स्मशानघाटात पोहोचली. स्मशानात शिवमच्या दफनविधीसाठी खड्डा खोदण्यात आला. यावेळी आरती शिवमला काळजाला लावून एक टक पाहत होती. 


बाळाचा देह मांडीवर ठेवून लावला काळा टीका, तिनेच केले तयार
- या संपूर्ण प्रक्रियेत शिवमचा मृतदेह आई आरतीच्या मांडीवरच होता. ती वारंवार आपल्या बाळाला काहीच झाले नसून तो फक्त झोपला असे सांगत होती. मानसिक धक्क्यात तिचे डोके काम करत नव्हते. तिने स्वतः आपल्या मुलाच्या मृतदेहाला स्नान घातले. यानंतर त्याला तयार करताना कपाळावर काळा टीका देखील लावला. नातेवाइकांनी तिला समजावून बाळाचा मृतदेह हिसकावला तेव्हा ती बेशुद्ध पडली. 
- मुलाला जेव्हा खड्ड्यात उतरवण्यात आले, तेव्हा आईने लाडाने त्याच्यासोबत टॉफी, मिठाई आणि खेळणी आपल्या बाळाच्या शेजारी ठेवल्या. तिने स्वतःच्या हाताने आपल्या बाळाच्या मृतदेहाभोवती त्याच्या आवडत्या खेळणी अगदी सजवून ठेवल्या. यानंतर सर्वांनी माती टाकण्यास सुरुवात केली, तेव्हा तिनेही तसेच केले. आपल्या लाडक्या बाळाला तिने अखेरचा निरोप दिला. 


असा घडला अपघात...
अमृतसरच्या जोडा फाटकाजवळ शुक्रवारी रावण दहन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारोंची गर्दी असल्याने लोक रावण दहन पाहण्यासाठी कार्यक्रम स्थळावर असलेल्या रेल्वे रुळावर थांबले होते. त्याचवेळी रावण दहन सुरू झाले. फटाक्यांच्या आवाजात भरधाव ट्रेन कधी आली आणि शेकडो लोकांना चिरडून निघून गेली कुणालाच कळले नाही. लोक पहिल्या अपघातातून पळून दुसऱ्या रुळावर गेले तेव्हा आणखी एक ट्रेन तशीच लोकांना चिरडून गेली. या अपघातावेळी घटनास्थळी 4000 लोक उपस्थित होते. यात 62 जणांचा चिरडून मृत्यू झाला आणि शेकडो नागरिक गंभीर जखमी झाले.

 

बातम्या आणखी आहेत...