आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैसे नसल्यामुळे नवजात मुलीला रूग्णालायात टाकून पळाला बाप, घरी जाताच पत्नीला म्हणाला- मुलगी मेली, डॉक्टर स्टाफने अडीच महिने केले चिमुकलीचे संगोपन, नाव ठेवले जोया...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यमुनानगर(हरियाणा)- अडीच महिन्यापूर्वीच ममतेश आपल्या नवजात मुलीला मृत माणून बसली होती. तिचा पती सुखविंदरने तिला सांगितले की, गाबा रूग्णालयात भर्ती असलेल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी डॉक्टरांनी ती चिमुकली ममतेशच्या कुशीत ठेवली, तेव्हा तिला अश्रु अनावर झाले. रूग्णालयतील डॉक्टरांनी जोया असे मुलीचे नामकरण केले, ज्याचा अर्थ होतो जीवन आणि आनंद असा होतो. मेअर मदन चौहान यांच्या उपस्थितीत मुलीला आईच्या स्वाधीन केले. त्यावेळी रूग्णालयातील डॉक्टर आणि स्टाफच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहिले. डॉक्टर ज्योतीने तर चिमुकलीसाठी स्वेटर विनले होते. डॉ. निखिल, स्टाफ सदस्य मनप्रीत आणि शीतलने आपल्या मुलीप्रमाणे चिमुकलीची काळजी घेतली.


डॉक्टर काय म्हणाले
'18 नोव्हेंबर 2018 ला आमच्या रूग्णालयात ककडौलीच्या ममतेशची प्री-मेच्योर डिलिव्हरी झाली होती. मुलीचे वजन 700 ग्राम होते. तिच्या कुटुंबीयांना सांगितले की, मुलीला नर्सरीमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवावे लागेल. पेंटरचे काम करणाऱ्या सुखविंदर आणि ममतेशची ही पहिली मुलगी होती. सुखविंदरने म्हटले- त्याची आर्थिक परिस्थीत ठीक नाहीये. त्यांना मुलीला कोणालातरी दत्तक द्यायचे आहे. मुलीला नर्सरीमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवले आणि सुखविंदरने आपल्या पत्नीला घरी नेले. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला मुलीच्या मृत्यूची खोटी बातमी दिली. त्याने मुलीला दत्तक देण्यासाठी अॅफीडेव्हीटदेखील बनवले. त्यानंतर त्या मुलीला दत्तक घेण्यासाठी अनेक लोक पुढे आले, पण डॉक्टरांनी स्पष्ट केले की आईच्या परवानगीशिवाय मुलीला कोण्याच्याही हवाली करता येणार नाही. काही दिवसानंतर रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी ममतेशला तिची मुलगी जिवंत असल्याची माहिती दिली. त्यावर तिला अश्रू अनावर झाले आणि ती म्हणाली- मुलीला मिळवण्यासाठी घरदेखील विकेल. त्यानंतर आम्ही निर्णय घेतला की, मुलीला तिच्या आईकडेच दिले जाईल. मुलीच्या उपचारावर अंदाजे 4 लाखांचा खर्च आला, पण त्यालाही माफ करण्यात आले. त्याशिवाय त्यांनी मुलीच्या पुढील उपचारावर लागणारा आणि तिच्या शिक्षणावर लागणारा सगळा खर्च उचलण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.' 
- डॉ. बी.एस. गाबा आणि डॉ. गितेंद्र गाबा


मुलीसाठी सगळं विकायला तयार आहे
ममतेशने सांगितले, मुलगी जिंवत असल्याची बातमी कळताच मला रडणे आवरले नाही. मी तेव्हा डॉक्टरांना सांगितले की, उपचारावर जितके पैसे लागले आहेत, ते सगळे माझे दागिने विकून फेडिल. तरिदेखील पैसे कमी पडल्यास इतरांच्या घरात काम करेल.

 

बातम्या आणखी आहेत...