आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाच्या आदेशानुसार पुरावे नष्ट करत होते पोलिस, तेवढ्यात शेजारच्या कबरीतून येऊ लागला मोठ्याने रडण्याचा आवाज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विल्किंसन - अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये काही पोलिस अधिकारी कोर्टाच्या ऑर्डरनुसार काही पुरावे नष्ट करण्याचे काम करत होते. त्याचवेळी त्यांना एका प्राण्याचा रडण्याचा आवाज ऐकू आला. बराच वेल तो आवाज येत होता. फार वेळ शोधल्यानंतर त्यांना समजले की, त्याठिकाणी असलेल्या एका कबरीखालून हा आवाज येत होता. त्यानंतर काहीसे घाबरतच त्यांनी त्याठिकाणी खोदकाम केले तेव्हा त्यांना जमिनीखाली एक पपी मिळाला. कोणीतरी त्याला तिथे जीवंत पुरले होते. 


डोळेही उघडले नव्हते 
- ही घटना अमेरिकेच्या फ्लोरिडात काही वर्षांपूर्वी घडली होती. विल्किंसन पोलिस कोर्टाच्या आदेशानुसार काही पुरावे नष्ट करण्याचे काम करत होते. 
- पोलिसांना एखा प्राण्याचा रडण्याचा आवाज आला. फारवेळ तो आवाज येत राहिल्याने तो कुठून येतोय याचा शोध पोलिस घेऊ लागले. 
- आवाजाच्या दिशेने गेल्यावर समजले की, एका ठिकाणी माती खोदलेली दिसली. कोणीतरी नुकचे खड्डे भरले असावे असे दिसत होते. पोलिसांनी तेथे खोदायला सुरुवात केली. 
- जवळपास 6 इंच खोदल्यानंतर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कुत्र्याचे एक पिलू त्यांना आढळले. ते फार तर दोन आठवड्यांचे असले. ते एवढे लहान होते की, त्याचे डोळेही उघडलेले नव्हते. 
- पोलिसांनी त्याला दूध पाजले आणि एका जवळच्या प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेले. काही दिवसांत ते पूर्ण बरे झाले. 
- बरे झाल्यानंतर त्याला एका केअर होममध्ये शिफ्ट केले. पण त्याला कोणी पुरले हे समजले नाही. पोलिसांनी ही घटना सोशल मीडियावर पोस्ट केली. 

बातम्या आणखी आहेत...