आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी पंढरीची माय! म्हणत, रितेशने जागवल्या वडील विलासराव देशमुख यांच्या आठवणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे 14 ऑगस्ट 2012 साली निधन झाले. त्यांच्या निधनाला सहा वर्षे लोटली आहेत. विविध स्तरातून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यांचा मुलगा आणि अभिनेता रितेश देशमुखनेही ट्विटरवर विलासरावांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. 


माझी पंढरीची माय..
रितेश देशमुखने पहिल्या पोस्टमध्ये विलासरावांना एका अभंगाच्या ओळींमधून श्रद्धांजली अर्पण केली आहे..
रितेशचे ट्वीट..

मी तुझ्यात विरता माझी,
राहीलीच ओळख काय?
माझी पंढरीची माय!
माझी पंढरीची माय!#विलासराव_देशमुख #६ #स्मृती_दिन #वडील #मित्र #श्वास #माझी_माऊली pic.twitter.com/9xyzT70aPq

— Riteish Deshmukh (@Riteishd) August 14, 2018

 

दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटला सर्वकाही बदलले..
रितेशने विलासरावांच्या आठवणीत आणखी एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये रितेशने रितेशने विलासरावांशी भावनिक संवाद साधला आहे. मी आकाशाकडे पाहून तुमच्याशी बोलतो.. पण उत्तरात मला तुमचा आवाज का ऐकू येत नाही.. असे रितेशने म्हटले आहे. तसेच तुम्ही गेले आणि सर्वकाही बदलले असेही त्याने ट्वीटमध्ये म्हटले.
रितेशचे ट्वीट..

I look up at the sky and I talk to you....
What I wouldn’t give to hear you talk back.

It’s been 6 years.....

There is one thing that changed when you left...

Everything!!!

Miss you PAPPA !!!! pic.twitter.com/DziD6Vng5l

— Riteish Deshmukh (@Riteishd) August 14, 2018

 

  

पुढे पाहा, विलासराव आणि रितेश यांचे काही PHOTOS

बातम्या आणखी आहेत...