आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पायलटला कळाले विमानात आहेत आपले स्कूल टीचर; केली इतकी भावूक अनाउंसमेंट, सर्वांचे डोळे पाणावले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - सोशल मीडियावर शेअर केला जाणारा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात आहे. विमानात शूट झालेल्या या व्हिडिओमध्ये वैमानिक एक विशेष घोषणा करत आहे. तो तुर्की भाषेत बोलत होता. परंतु, काही वेळातच संपूर्ण हकीगत समोर आली. तुर्किश एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये आपले शाळेतील शिक्षक सुद्धा प्रवास करत आहेत अशी माहिती नेमकी वैमानिकाला मिळाली. यावर त्याने आपल्या शिक्षकाला सरप्राइज देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. याच कारणास्तव त्याने एक इमोशनल अनाउंसमेंट केली आणि सर्वांनाच भावूक केले. 


विमान हवेत असताना अचानक वैमानिकाने घोषणा केली, की "आदरणीय प्रवाशांनो, मी कॅप्टन बोलतोय. आजचा दिवस माझ्या आयुष्यात खूप खास आहे. आज आपल्यासोबत माझे शिक्षक सुद्धा प्रवास करत आहेत. त्यांच्यामुळेच मी वैमानिक होऊ शकलो. ते स्वतः एक कॅप्टन होते. त्यानंतर शिक्षक बनले. त्यांनी मला वैमानिक होण्याची प्रेरणा दिली. मी आज जे काही आहे, ते त्यांच्यामुळे बनू शकलो." यापुढे वैमानिक म्हणाला, "माझे कॅप्टन, माझे टीचर सादिक ओनर मी आपले या विमानात स्वागत करतो. मला हे सांगण्यात अतिशय आनंद होत आहे की मी आपल्याकडून शिकलो. आपण माझ्या वडिलांसारखे आहात. माझे मित्र देखील आहात. तुर्किश एअरलाइन्सतर्फे मी आपले खूप-खूप स्वागत करतो." यानंतर एअरलाइन्स स्टाफने एक फुलांचा बुके त्या शिक्षकांना दिला. ही घोषणा आणि हे क्षण पाहून विमानातील सर्वच प्रवाशी भावूक झाले. तर शिक्षकांचे डोळे आदर, गर्व आणि भावनांनी भरले होते.

बातम्या आणखी आहेत...