आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) नवीन वर्षात खातेधारकांच्या पीएफ खात्यात जमा रकमेमधून शेअरमधील गुंतवणूक वाढवण्याचा पर्याय देण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त इतर सामाजिक सुरक्षेचे लाभ आणि खात्यात जमा रकमेला मॅनेज करण्यासाठी डिजिटल टूलसारखी सुविधा दिली जाऊ शकते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) पीएफ खातेधारकांना जमा रकमेचा १५ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा एक्स्चेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) मध्ये गुंतवणूक करते. आतापर्यंत ईपीएफओने सुमारे ५५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
पीएफ खात्यांमध्ये नगदी आणि ईटीएफ गुंतवणूक दोन्हींचा समावेश असतो. मात्र, आता खातेधारक पीएफ खाते लॉगइन करतात तेव्हा त्यांना एकत्र रक्कम दिसते.
यामुळे त्यांच्या जमा रकमेमधील ईपीएफओ कोठे आणि किती गुंतवणूक करत आहे याची माहिती त्यांना मिळत नाही. भागधारकाकडे खात्यात जमा रकमेपैकी शेअरमध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवण्याचाही पर्याय नाही. आता ईपीएफओ असे सॉफ्टवेअर तयार करत आहे, ज्यामध्ये पीएफ खात्यात नगदीच्या आणि ईटीएफची भागीदारी स्वतंत्र दाखवणार आहे. खातेधारकाला शेअर बाजारातील गुंतवणूक वाढवण्याची इच्छा असेल तर वाढवू शकणार आहे.
ईपीएफओमध्ये २० कोटी खातेधारक, शेअरमध्ये गुंतवणुकीतून मिळेल जास्त परतावा
ईटीएफवर १६% परतावा
ईपीएफओ ऑगस्ट २०१५ पासून ईटीएफमध्ये गुंतवणूक करत आहे. तेव्हा पाच टक्के गुंतवणूक करण्याची परवानगी होती. सध्या १५ टक्के मर्यादा आहे. या वर्षी मेपर्यंत या गुंतवणुकीवर १६ टक्के परतावा मिळाला होता.
२ वर्षांपासून व्याजात घट
ईपीएफओच्या एका समितीने जास्त परतावा मिळावा यासाठी शेअरमध्ये पाच ते दहा वर्षांपर्यंत गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. यामुळे पूर्ण पीएफवर व्याज वाढण्याची शक्यता आहे. सध्या दोन वर्षांपासून पीएफवरील व्याज कमी होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.