आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेल्सचे टारगेट पूर्ण केले नाही म्हणून मालकाला आला राग, कर्मचाऱ्यांना सर्वांसमोर दिली विचित्र शिक्षा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


वूशी : चीनमध्ये एका ब्यूटी सलूनमधील कर्मचाऱ्यांनी त्यांचे सेल्स टारगेट पूर्ण न केल्यामुळे मालकाने त्यांना अजब शिक्षा केली. सध्या या शिक्षेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये एक कर्मचारी आपल्या बॉससमोर 100 वेळा स्वतःच्या कानशिलात लगावताना दिसत आहे. एका कर्मचाऱ्याने सांगितले की, बॉसने आदेश दिला आहे की, स्वतःला जोरात थापड न मारल्यास त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येईल. आपले सेल्स टारगेट पूर्ण न केल्यामुळे बॉसने शिक्षा केल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले.


काय आहे व्हिडिओमध्ये 

- चीनच्या वूशी शहरात रूनफा हेअर सलूनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना दररोज 30 ते 40 हजार रूपयांचे हेअर प्रॉडक्ट्सची विक्री करायची असते. पण कर्मचाऱ्यांकडून हे टारगेट पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्यांच्या मालकाने शिक्षा करण्याची कठोर भूमिका घेतली. 

- सलूनमध्ये काम करणाऱ्या पेन नामक एका कर्मचाऱ्याने सांगितले की, मॅनेजमेंटने त्यांच्या साथीदारांसमोर स्वतःला थापड मारण्याचे आदेश दिला. चेहरा लाल झाला नाही तर त्यांना 5 हजार रूपये दंड आकारण्यात येईल.

- अनेक कर्मचाऱ्यांनी या आदेशाचा विरोध केला असता त्यांनी दुसऱ्याच दिवसापासून नोकरीवरून काढून टाकले. कर्मचाऱ्यांचा दावा आहे की, नोकरीवरून काढण्याच्या बहाण्याने बॉसने त्यांचा लाखो रूपयांचा पगार अडवून ठेवला आहे. 

 

चीनमध्ये तयार होत आहे छळ करण्याची संस्कृती

- चीनमध्ये सार्वजनिकरित्या छळ करण्याची प्रथा पडत चालली आहे. गेल्या महिन्यात एका रेस्तराँमध्ये एक कर्मचाऱ्याला बेल्टने मारहाण करण्यात आली होती. टारगेट पूर्ण न केल्यामुळे स्वतःचे मूत्र पिण्यास आणि कीडे खाण्यास मजबूर केले होते. 

- जून 2016 मध्ये शांझी प्रोविन्समध्ये कमर्शिअल बँकमध्ये आठ कर्मचाऱ्यांच्या खराब कामामुळे त्यांना दांडुक्याने मारहाण करण्यात आली होती. 

बातम्या आणखी आहेत...