आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिसेंबरमध्ये सेवा क्षेत्रात मंदी, मात्र रोजगारात वाढ; निक्केई इंडियाची माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशातील सेवा क्षेत्रातील घडामोडी वाढण्याची गती डिसेंबरमध्ये थोडी मंदावली. नवीन व्यापारी ऑर्डरची संख्या कमी झाल्याने व्यावसायिक घडामोडींमध्ये मंदी आल्याने हा परिणाम झाला आहे. मात्र, या दरम्यान रोजगार निर्मितीची गती वाढली असल्याचे दिसून आले. ही माहिती निक्केई इंडियाच्या मासिक सर्व्हेमध्ये समोर आली आहे. या अहवालानुसार सेवा क्षेत्रातील बिझनेस अॅक्टिव्हिटी डिसेंबरमध्ये ५३.२ नोंदवण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये हा आकडा ५३.७ वर होता. या क्षेत्रात ०.५ ची घट दिसून आल्यानंतरही सलग सातव्या महिन्यात विस्तार दिसून आला आहे. हा निर्देशांक ५० च्या वर असल्यास त्या क्षेत्रातील घडामोडींमध्ये वाढ, तर ५० च्या खाली असल्यास संबंधित क्षेत्रातील घडमोंडीमध्ये घट होत असल्याचे मानले जाते.

 

या मासिक सर्व्हेनुसार व्यावसायिक धारणा डिसेंबरमध्ये वाढून तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. वास्तविक निवडणुकीच्या आधी यामध्ये काही प्रमाणात घसरण होण्याचीही शक्यता आहे. आयएचएस मार्किटच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आणि अहवालाच्या लेखिका पॉलीयाना डी लीमा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सेवा क्षेत्रातील रोजगारात वाढ झाल्याने सकारात्मक धारणा वाढली आहे.