आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किमोथेरपीदरम्यान मुलासाठी 'बॅटमॅन' होऊन फोन करायचा इम्रान हाश्मी, केबीसीच्या सेटवर सांगितला अनुभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीने अलीकडेच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर करमवीर स्पेशल एपिसोडमध्ये हजेरी लावली. याप्रसंगी इम्रानने मुलाच्या आठवणी सांगितल्या. त्याचा मुलगा अयान 5 वर्षांचा असताना कर्करोगाचे िनदान झाले होते. त्याच्या किमोयोथेरपी- दरम्यानचा एक किस्सा या खास भागात इम्रानने सांगितला...

  • किमोथेरपीदरम्यान मुलासाठी 'बॅटमॅन' होऊन फोन करायचा इम्रान

'कुटुंबातील कोणत्याही सदस्याला कर्करोग झाला तर ते कुटुंब मानसिकदृष्ट्या खचते. अयानला कॅन्सर असल्याचे आम्हाला जेव्हा कळले तेव्हा आमच्या संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला होता. पालक म्हणून आमच्यासाठी हा खूप कठीण काळ होता. आमच्या मनात भीती बसली होती. मानसिकरीत्या ही संपूर्ण प्रक्रिया त्रासदायक होणार होती. या रोगाबद्दलच्या माझ्या संशोधनादरम्यान, मला आढळले. यात उपचारामध्ये पौष्टिक आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावते, कारण उपचारादरम्यान शरीराला मजबूत रोगप्रतिकारशक्तीची आवश्यकता असते. अयानची किमोथेरपी सात महिने चालली.'  'किमोथेरपी मुलांसाठी सोपी नसते. त्या काळात तो खूप चिडचिडही करायचा, सामान इकडे-तिकडे फेकायचा, जेवणही करत नव्हता, त्या वेळी चांगले जेवण करणे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ते खूप गरजेचे आहे. अयानला जेवू घालण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागायची. रोज त्याचे काही ना काही लाड पुरवावे लागायचे. तरीदेखील तो ऐकत नव्हता तेव्हा माझ्या पत्नीने एक शक्कल लढवली. पत्नीने माझा फोन नंबर 'बॅटमॅन' नावाने सेव्ह केला आणि माझे डिस्प्ले पिक्चरदेखील एका सुपर हीरोचे ठेवले. त्यानंतर मी रुग्णालयाच्या बाहेर जायचो आणि त्याला फोन करायचो. अशा प्रकारे आपल्याला बॅटमॅन खायला सांगत आहे, असे अयानला वाटायचे. तो बॅटमॅनचा मोठा चाहता आहे, त्याचे म्हणणे तो नाकारू शकत नाही. अशा पद्धतीने आम्ही त्याला खायला देत होतो. अयानच्या उपचारादरम्यान कर्करोग परत येण्याची भीतीदेखील होती. वैद्यकीय उपचारानंतरही बरीच काळजी घ्यावी लागते, ज्यास संबंधित व्यक्तीच्या योग्य पोषण आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागते. '

बातम्या आणखी आहेत...