आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इमरान हाशमीच्या 9 वर्षांच्या मुलाने कँसरवर केली मात, वडील म्हणाले - तुम्हीही जिंकू शकता 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क. इमरान हाशमीसाठी आज आनंदाचा दिवस आहे. त्याचा 9 वर्षांचा मुलगा अयानने कँसरला हरवले आहे. 5 वर्षे डायग्नोसिसवर राहिल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, "आता तो पुर्णपणे निरोगी आहे. अयानचा कँसर नष्ट झाला आहे." इमरानने इंस्टाग्रामवर आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. 

 

इमरानने मानले चाहत्यांचे आभार 
फोटो शेअर करत इमरानने लिहिले की, 5 वर्षांच्या डायग्नोसिसनंतर आज अयानला कँसर फ्री घोषित करण्यात आले आहे. हा खुप लांबचा प्रवास होता. तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांसाठी आभारी आहे. त्याने लिहिले की, कँसरचा लढा देणा-या सर्व लोकांना माझे प्रेम आणि माझ्या शुभेच्छा. आशा आणि विश्वास कायम ठेवा. तुम्ही ही लढाई जिंकू शकता. 

 

शॉक्ड झाला होता इमरान : अयानचा जन्म 2010 मध्ये झाला होता. अयान इमरान आणि त्याची पत्नी परवीन शाहनीचे पहिले आपत्य आहे. 2014 मध्ये अयान चार वर्षांचा होता तेव्हा त्याला कँसर असल्याचे समजले. अयानचा कँसर पहिल्या स्टेजवर होता. यावेळी इमरान पुर्णपणे शॉक्ड होता. त्याने स्वतःला प्रश्न विचारला की, चुक कुठे झाली?

 

इमरानने लिहिले पुस्तक : यानंतर कँसरविषयी लोकांना जागरुक करण्यासाठी आणि आपली कहाणी शेअर करण्याच्या उद्देशाने त्याने एक पुस्तक लिहिले. 'द किस ऑफ लाइफ: हाउ अ सुपरहीरो अँड माय सन डिफेक्टेड कँसर' असे हे पुस्तक होते. यामध्ये त्याने अयानचा जन्म, त्याला झालेला कँसर आणि त्यावरील उपचारांविषयी लिहिले. 


 

 

बातम्या आणखी आहेत...