आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Encounter Between Jawans And Naxalites In Bijapur, Jawan Martyr, A Villager Also Dies

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकित सीआरपीएफचे दोन जवान शहीद, एका मुलीचाही यात मृत्यू

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजापूर(छत्तीसगड)- येथील बीजापूरमध्ये आज(शुक्रवार)सकाळी सीआरपीएफचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात सीएरपीएफच्या सब इंस्पेक्टरसहित दोन जवान शहीज झाले, तर एक जवन जखमी झाला आहे. यावेळी क्रॉस फायरिंगमध्ये एका अल्पवयिन मुलीचाही मृत्यू झाला आहे.


पेट्रोलिंगवर निघालेल्या टीमवर हल्ला
चकमक केशकुतूलजवळ झाली. येथे सीआरपीएफ आणि स्थानीक पोलिस टीम पेट्रोलिंगवर निघाली होती. त्यावेळेस नक्षलवाद्यांनी टीमवर हल्ला केला. यात ओपी साझी आणि महादेव पाटिल यांच्या मृत्यू झाला, तर जवान मदनलाल जखमी झाले. जवनांकडूनही या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यात आले. यावेळी फायरिंगमध्ये येऊन एक अल्पवयिन मुलगी जिब्बी तेलमचाही मृत्यू झाला, तर एक आदिवासी अल्पवयीन मुलगी रिंकी हेमला जखमी झाली.