आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादमधील एन्काउंटरचा वाद; काेर्ट परिसरात वकिलांतच जुंपली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एन्काउंटरचे समर्थन करणाऱ्या वकिलांनी वाटली जिलेबी, विराेधात बाजू न मांडण्याचाही निर्णय

हैदराबाद- डाॅ. दिशा(नाव बदललेले) यांच्यावर अत्याचार करणाऱ्या अाराेपींच्या एन्काउंटरवरून उच्च न्यायालयात सुनावणी हाेण्यापूर्वी साेमवारी काेर्ट परिसरात वकिलांच्या दाेन गटातही वाद उफाळून अाला हाेता. या एन्काउंटरची चाैकशी व्हावी, या मागणीची अजुन एक जनहित याचिका अॅड. व्यंकण्णा यांनीदेखील दाखल केली हाेती. ते कळताच इतर वकील संतप्त झाले. अॅड. व्यंकण्णा काेर्ट परिसरात येताच एन्काउंटरचे समर्थन करणाऱ्या वकिलांनी त्यांना घेराव घातला व ‘तुम्ही याचिका का दाखल केली?’ असा जाब विचारला. त्यामुळे वकिलांच्या दोन गटांत वाद सुरू झाला. एन्काउंटरच्या विरोधात कुणीही बाजू मांडायची नाही, अशी भूमिका काही वकिलांनी घेतली. या वादानंतर दुपारी एक वाजता बार कौन्सिलच्या सभागृहात बैठक झाली. तर बार काैन्सिलच्या कक्षात काही वकिलांनी  ‘आम्ही एन्काउंटरला पाठिंबा देतो’, असे म्हणत जिलेबीही वाटली. 


साेमवारी सुनावणी सुरू झाली तेव्हा न्यायमूर्ती ए. अभिषेक रेड्डी आणि राघवेंद्र चौहान यांच्या खंडपीठाने ‘पीयूसीएल (पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टी ) विरुद्ध महाराष्ट्र सरकार २०१४ या खटल्यातील मार्गदर्शक सूचना तुम्ही पाळल्यात का? पोलिसांच्या विरोधात गुन्हा का दाखल केला नाही?’ असा सवाल पोलिसांना केला. तसेच ‘पीयूसीएल खटल्या’चा परिच्छेदही वाचून दाखवला. घटनेच्या कलम १४१ नुसार जोपर्यंत एन्काउंटरबाबत कायदा तयार होत नाही तोपर्यंत या खटल्यातील मार्गदर्शक सूचना कायद्याप्रमाणे पाळण्यात याव्यात असे ‘पीयूसीएल विरुद्ध महाराष्ट्र शासन’ या खटल्यात सर्वाेच्च न्यायालयाने म्हटले अाहे,’ याकडेही न्यायमूर्ती रेड्डी यांनी लक्ष वेधले.उच्च न्यायालयात आता पुढील सुनावणी होणार १२ डिसेंबर रोजी
१९९५ ते १९९७ पर्यंत मुंबईत झालेल्या ९९ एन्काउंटरबाबत पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 
 हा खटला कालांतरने सर्वाेच्च न्यायालयात गेला. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने २३ सप्टेंबर २०१४ रोजी एन्काउंटरबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. तेव्हापासून ही मार्गदर्शक तत्त्वे एन्काउंटरसाठी कायदा म्हणून पाळले जातात. 


डॉ. दिशा बलात्कार आणि खून प्रकरणात आतापर्यंत दोन गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा हा मृत दिशाच्या बहिणीच्या फिर्यादीनुसार शादनगर पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. त्यात चार आरोपी असून त्यांचे एन्काउंटर झाले आहे. यात कलम ३०२, ३७६, २०१ आदी कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


 दुसऱ्या गुन्ह्यात एसीपी व्ही. सुरेंद्रम हे फिर्यादी असून ६ डिसेंबर रोजी पहाटे गुन्ह्याचा तपास करताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला असे त्यात म्हटले आहे. कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 तिसरा गुन्हा एन्काउंटर करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात दाखल करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून होते आहे. हैदराबादमध्ये एन्काउंटर कल्चर  : अॅड. शकी
 
पाेलिसांची बाजू मांडणारे अॅड. शकील म्हणाले. ‘१९७० पासून तेलंगण आणि आंध्र प्रदेशमध्ये एन्काउंटर कल्चर आहे. यापूर्वी नक्षलवादाच्या नावाखाली ते होत होते. जनतेत हीरो होण्यासाठी पोलिसांकडून एन्काउंटर केले जातात. १९७० पासून २०१९ पर्यंत सुमारे ४ हजार लोकांना एन्काउंटरमध्ये मारण्यात आले.’ अॅड. शकील हे मानवी हक्क संघटनेचे पदाधिकारी अाहेत.

    तेलंगण पोलिसांनी नियुक्त केली एसआयटी. 
    राचकोंडाचे पोलिस आयुक्त भागवत एसआयटीचे प्रमुख. 
    राष्ट्रीय मानवधिकार आयोगाचा दौरा पूर्ण, दिल्लीत अहवाल करणार सादर. 
    पीडिता आणि आरोपींच्या कुटुंबांचा एनएचआरने नोंदवला जबाब. 
    जखमी पोलिसांची चौकशी, आरोपींच्या मृतदेहाची एनएचआरकडून पाहणी. 
    आतापर्यंत दोन गुन्हे दाखल : तिसऱ्या गुन्ह्याची मागणी

बातम्या आणखी आहेत...