आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फाशी होत नसेल तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटरच योग्यय', जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारेंची प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैद्राबादप्रकरणी चारही आरोपींचा एन्काउंटरमध्ये खात्मा झाला

मुंहई- हैद्राबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा एन्काउंटरमध्ये खात्मा करण्यात आला. त्यानंतर देशात दोन गट तयार झाले. काहीजण एन्काउंटरच्या बाजूने बोलत होते तर काहीजण त्याच्याविरुद्ध. यातच आता जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. "फाशी होत नसेल तर एनकाउंटरच योग्य," अशी प्रतिक्रीया आण्णांनी दिली आहे.आण्णा हजारे म्हणाले की, ''देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या वारंवार घटना घडत आहेत. ते सर्व खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसेल, तर पोलिसांनी केलेले एन्काऊंटर योग्यच आहे. हैदराबादमधील घटनेत आरोपी पोलिसांवर प्रतिहल्ला करून पळून जात होते. त्या परिस्थितीत त्यांचे झालेले एन्काऊंटर योग्य आहे. दिल्लीतही पूर्वी अशीच अत्याचाराची घटना घडली होती. त्यातील आरोपींना अद्याप फाशी झालेली नाही." असेही आण्णा हजारे म्हणाले. हैदराबाद एन्काऊंटरप्रकरणी अनेकांकडून संशय व्यक्त केला जात असताना अण्णा हजारे यांनी ही थेट भूमिका घेतली आहे.

बातम्या आणखी आहेत...