आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Encounter In Jammu Kashmir (Pulwama District) Tral Area; Three Terrorists Killed.

पुलवामामध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिजबुल आणि लश्करचे 3 दहशतवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षादलांना त्रालमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरू झाले

श्रीनगर- दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. त्रालच्या गुलशनपोरामध्ये झालेल्या या चकमकीत हिजबुल मुजाहिदीन आणि जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले. मारलेल्या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा मिळाला.


रविवारी सकाळी भारकीय लष्कर आणि पोलिसांना या परिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या दरम्यान दहशतवाद्यांनी फायरींग सुरू केली. त्यांना उत्तर देताना भारतीय लष्करानेही फायरींग केली आणि त्यात हिजबुलशी संबंधित उमर फैयाज लोन आणि आदिल बशीर मीर तसेच जैश-ए-मोहम्मदशी संबंधित फैजान अहमद भट्‌ट मारगेले गेले. चकमकीनंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पाकिस्तानी बॅटने भारतीय पोर्टरचे शीर कापले

शनिवारी एलओसीवर गोळीबारानंतर पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीम (बॅट)ने भारतीय लष्करातील एका पोर्टरचे शीर कापून नेले. यावर लष्करप्रमुख नरवणे यांन माध्यमांनी याबाबत विचारले असता, ते म्हणाले की, भारतीय लष्कर कोणत्याही हल्ल्यासाठी तयार आले. योग्यवेळी उत्तर दिले जाईल.

बातम्या आणखी आहेत...