आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी समस्या: शाळांबराेबरच अाता मंदिरांनाही पडला फेरीवाल्यांचा गराडा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - फेरीवाल्यांना योग्य जागा मिळावी यासाठी महापालिका प्रशासनाने चक्क शाळा, रहिवासी आणि मंदिरांना लागूनच फेरीवाला क्षेत्राची निर्मिती केली. त्यामुळे मंदिरांची शांतता भंग पावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिकरोडला दहा ठिकाणी फेरीवाला झोन झाल्यास त्या ठिकाणी गर्दी वाढून महिला आणि भाविकांची सुरक्षा वाऱ्यावर येणार आहे.

 

नाशिकरोड परिसरात सध्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेले भाजीपाला विक्रेते, हातगाड्यावर पदार्थांची विक्री करणारे, फळांच्या हातगाड्या यामुळे वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे महापालिकेने फेरीवाल्यांची सोय लावण्यासाठी चक्क शाळा, मंदिरे आणि रहिवासी क्षेत्रामध्ये फेरीवाला झोन तयार केले आहेत. आर्टिलरी सेंटर रोडवर जैन मंदिरासमोर आणि महापालिकेच्या क्रीडांगणाच्या बाजूला फेरीवाला क्षेत्र तयार करण्यात आले आहे. हे क्षेत्र तयार होण्यापूर्वीच या ठिकाणी अतिक्रमण झाले असून महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी टवाळखोरांची अधिक संख्या असून फेरीवाला झोनमुळे त्यामध्ये वाढ होणार आहे. तर जेलरोड येथील शनिमंदिराच्या बाजूला गर्दीचे ठिकाण असून या ठिकाणी फेरीवाला झोन तयार झाल्यास अपघातांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. रुक्मिणीनगर येथील दत्तमंदिरासमोर फेरीवाला झोन तयार करण्यात आला आहे.


बिग बाजारजवळील म्हसोबा महाराज मंदिराला लागून फेरीवाला झोन तयार करण्यात आल्याने या रस्त्यावर अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. या परिसरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडत असून त्याला या माध्यमातून खतपाणीच मिळणार आहे.

 

 

बाजार समिती जागा देण्यास तयार
नाशिक बाजार समितीच्या वतीने महापालिकेला पत्रव्यवहार केला आहे. शहरात मंदिर आणि शाळांच्या बाजूला फेरीवाला झोन करण्याऐवजी सिन्नरफाटा येथील बाजार समितीच्या क्षेत्रात त्यांना द्यावी. आम्ही त्यांना जागा देण्यास तयार आहाेत.
- शिवाजी चुंभळे, सभापती, नाशिक बाजार समिती

 

शहरात अापल्या भागात घाेषित करण्यात अालेल्या फेरीवाला क्षेत्राबाबत अापल्याला काय वाटते? या क्षेत्रामुळे काही अडचणी भासत असल्यास वा या क्षेत्रांमुळे अडचणी कमी हाेतील असे वाटल्यास 'दिव्य मराठी'ला ९९७५५४७६१६ किंवा ९७६७६४८८६० या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर माहिती कळवा.

 

बातम्या आणखी आहेत...