आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Endless War Cannot Continue In Cases Like Death Punishment': Chief Justice Bobde

'मृत्युदंडासारख्या प्रकरणांमध्ये अंतहीन लढाई चालू शकत नाही' : सरन्यायाधीश बोबडे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेला कायदेशीर डावपेचांची आडकाठी घालण्याच्या वाढत्या प्रकारांवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कठोर टिप्पणी केली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले, मृत्युदंडाच्या प्रकरणांची एक बाजू अत्यंत महत्त्वाची आहे. या शिक्षेला सतत आव्हान देत राहू आणि ही अंतहीन लढाई सुरू राहील, असे दोषींना वाटायला नको. सुप्रीम कोर्टाने केवळ आरोपींच्याच नव्हे, तर पीडितांच्या अधिकारांवरही लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे १० महिन्यांच्या एका मुलासह सात लोकांची हत्या झाली होती. यातील दोषी शबनम व सलीम यांच्या मृत्युदंडाविरुद्ध दाखल याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली.

निर्भया प्रकरणातील दोषी सध्या कायदेशीर पळवाटा काढून फाशी लांबवत आहेत. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांची टिप्पणी महत्त्वाची आहे. आजकालच्या घटना पाहता मृत्युदंडाची प्रकरणे नेहमी पुढे चालत राहतात. या शिक्षेच्या अंमलबजावणीस अंतहीन खटल्यांत अडकवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कोर्टाने निकाल राखून ठेवला.

केवळ वागणूक चांगली म्हणून माफी नको

  • केवळ तुरुंगातील वागणूक चांगली आहे म्हणून पूर्वीच्या गुन्ह्यांत माफी नको, असे सरन्यायाधीश म्हणाले.
  • उत्तर प्रदेशात उच्चशिक्षित शबनमने पाचवी उत्तीर्ण प्रियकराला हाताशी धरून हे सात खून केले होते.
  • मजुरी करणाऱ्या सलीमचे स्थळ कुटुंबीयांनी मान्य केले नाही म्हणून या हत्या करण्यात आल्या होत्या.

... अखेरच्या भेटीची इच्छा व्यक्त केली नाही

१ फेब्रुवारीसाठी डेथ वॉरंट निघाले असतानाही निर्भया हत्याकांडातील चारही दोषींनी अद्याप कुटुंबीयांची अखेरची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केलेली नाही. 

अजूनही कायदेशीर पर्यायांत अडकून फाशी टळेल, अशी त्यांना आशा आहे.

नवी दिल्ली : फाशीच्या शिक्षेला कायदेशीर डावपेचांची आडकाठी घालण्याच्या वाढत्या प्रकारांवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी कठोर टिप्पणी केली. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले, मृत्युदंडाच्या प्रकरणांची एक बाजू अत्यंत महत्त्वाची आहे. या शिक्षेला सतत आव्हान देत राहू आणि ही अंतहीन लढाई सुरू राहील, असे दोषींना वाटायला नको. सुप्रीम कोर्टाने केवळ आरोपींच्याच नव्हे, तर पीडितांच्या अधिकारांवरही लक्ष दिले पाहिजे. उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे १० महिन्यांच्या एका मुलासह सात लोकांची हत्या झाली होती. यातील दोषी शबनम व सलीम यांच्या मृत्युदंडाविरुद्ध दाखल याचिकांवर सुनावणी करताना सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली.

निर्भया प्रकरणातील दोषी सध्या कायदेशीर पळवाटा काढून फाशी लांबवत आहेत. या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांची टिप्पणी महत्त्वाची आहे. आजकालच्या घटना पाहता मृत्युदंडाची प्रकरणे नेहमी पुढे चालत राहतात. या शिक्षेच्या अंमलबजावणीस अंतहीन खटल्यांत अडकवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कोर्टाने निकाल राखून ठेवला.

... 'त्या' न्यायाधीशांची सुप्रीम कोर्टात बदली

निर्भया प्रकरणातील दोषींवर डेथ वॉरंट बजावणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीशकुमार अरोरा यांची बदली झाली आहे. त्यांना एक वर्षासाठी सुप्रीम कोर्टात अतिरिक्त रजिस्ट्रार म्हणून प्रतिनियुक्ती देण्यात आली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...