आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संतप्‍त ग्राहकाने कच-यात फेकली Royal Enfield ची ही दुर्मिळ बुलेट, कंपनीच्‍या या चुकीमुळे झाला संतप्‍त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑटो डेस्‍क - नुकतीच लॉंच झालेली रॉयल एनफील्‍डची क्‍लासिक 500 पेगासस बाईक वादात सापडली आहे. मीडिया रीपोर्ट्स अनूसार, ग्राहक या कंपनीवर नाराज आहेत आणि याचे कारण आहे कंपनीने नुकतीच लॉंच केलेली बाईक क्‍लासिक सिग्‍नल 350. 

 

काय आहे विवाद 
- पेगाससच्‍या ग्राहकांचे म्‍हणणे आहे, रॉयल एनफिल्‍डने नुकतीच लॉंच झालेली  सिग्‍नल 350 ही बाईक अगदी पेगासससारखीच दिसते. लिमिटेड एडिशन असलेल्‍या पेगाससची किंमत जवळपास 2.5 लाख रुपये आहे. एवढी महागडी असूनही तिच्‍यात सेफ्टीसाठी ABS (ऑटोमॅटीक ब्रेक सिस्‍टीम)  नाही. तर दुसरीकडे सिग्‍नल 350ची किंमत पेगाससपेक्षा कमी असून तिच्‍यात ड्युअल चॅनल ABS सारखे फिचर्स आहेत. 
- कंपनीने पेगासस बाईकला लिमिटेड एडिशन म्‍हणून लॉंच केले होते. ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्‍यानंतर केवळ 3 मिनिटांत सर्व 250 बाईक्‍स विकल्‍या गेल्‍या होत्‍या. 

 

कच-यात फेकली बाईक 

- त्‍यामुळे क्‍लासिक पेगासस 500 बाईकवर संतप्‍त झालेल्‍या काही ग्राहकांनी ही बाईक चक्‍क कच-यात फेकून दिली आहे. तर काही जणांनी तिला नगर पालिकेला कचरा उचलण्‍यासाठी दिली आहे. 
- काही लोकांनी परिवहन मंत्रालयामध्‍ये आरटीआय फाईल करून विचारणा केली आहे की, सुरक्षा मानकांच्‍या कसोटीवर उतरलेली नसतानाही या बाईकला सरकारने लॉंच का होऊ दिले. 
- तर काही लोकांनी यावरही राग व्‍यक्‍त केला आहे की, विदेशात या बाईकला ड्युअल चॅनल ABS फिचर्ससह लॉंच केले गेले तर भारतात कोणत्‍याही सेफ्टी फिचर्सशिवाय बाईकची विक्री केली गेली.


कंपनीने उचलली ही पावले
- या बाईकवर नाराज झालेल्या ग्राहकांकडून बाईक परत खरेदी केली जाईल, असे कंपनीने आता म्‍हटले आहे. 
- डीलरद्वारे या बाईक्‍सची खरेदी करून त्‍यांना गरजवंत ग्राहकांना विकण्‍यात येईल, असे कंपनीने म्‍हटले आहे.     


   

 

बातम्या आणखी आहेत...