Home | Maharashtra | Mumbai | enforcement directorate raid at the premises of accused of icici videocon case

व्हिडिओकॉनचे वेणुगोपाल धूत, चंदा कोचर यांच्या घरावर ईडीचे छापे, औरंगाबाद व मुंबर्इत कारवाई

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 01, 2019, 08:32 PM IST

चंदा कोचर यांनी व्हिडिओकॉनला नियम डावलून 3250 कोटींचे कर्ज दिले होते.

 • enforcement directorate raid at the premises of accused of icici videocon case

  मुंबर्इ/औरंगाबाद- बँक कर्ज घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर, व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्या कार्यालय व निवासस्थानावर शुक्रवारी छापे मारले. मुंबर्इ व औरंगाबादेतील पाच कार्यालये व निवासी संकुलावर ही कारवार्ई झाली. जानेवारीतही अशाच प्रकारे छापे टाकण्यात आले होते. गेल्या महिन्यात ईडीने चंदा कोचर,त्यांचे पती दीपक कोचर, वेणुगोपाल धूत आणि इतरांविरुद्ध मनी लाँडरिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

  औरंगाबाद : धूत बंधूंच्या मालमत्तेची ९ तास झाडाझडती
  औरंगाबादेत दिल्लीच्या ईडीच्या पथकाने व्हिडिओकॉन कंपनीसह धूत बंधूंच्या मालमत्तांची सखोल चौकशी केली. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या टीमने धूत यांच्या कार्यालयात ठाण मांडून शेकडो कागदपत्रे तपासली.

  सकाळी ८ वाजता :
  दिल्लीतील ३ अधिकाऱ्यांची टीम औरंगाबाद विमानतळावर दाखल झाली. ते टॅक्सीने पैठण रोडवरील धूत यांच्या बंगल्यावर गेले. तेथे तपासणी करण्यात आली. यानंतर ही टीम अदालत रोडवरील व्हिडिओकॉनच्या ओटोकार्स या कार्यालयात गेली. हे कार्यालय काही दिवसांपासून सील असून तेथे मोजकेच कर्मचारी होते. तेथील मालमत्तेसह कंपनीची कागदपत्रे तपासण्यात आली.

  सकाळी १० ते सायंकाळी ५ :
  ऑटोकार्सच्या पहिल्या मजल्यावर कागदपत्रे तपासणीचे काम सुरू होते. व्हिडिओकॉनसह धूत यांच्या जवळचे मोजकेच कर्मचारी तपासात सहकार्य करत होते.

  दररम्यान, चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि कार्यकारी अधिकारी पदाचा ऑक्टोबर 2018 मध्ये राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी संचालक मंडळाकडे लवकरात लवकर निवृत्ती देण्याची मागणी केली होती. बँकेने नेमलेल्या स्वतंत्र चौकशी समितीमध्ये कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले आहे. बँकेच्या संचालकांनी कोचर यांनी दिलेला राजीनामा म्हणून न स्वीकारता ते निलंबन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामुळे त्यांना नोकरी पश्चात सेवांचा फायदा मिळणार नसून बोनसही मिळू शकणार नाही.

  सीबीआयकडूनही गुन्हा दाखल..

  चंदा कोचर यांच्यावर सीबीआयने याच महिन्यात गुन्हा दाखल केला होता. तसेच तिचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे मालक वेणुगोपाल धूत यांच्याविरोधतही गुन्हा दाखल केला आहे. कोचर यांनी व्हिडिओकॉनला नियम डावलून 3250 कोटींचे कर्ज दिले होते.

Trending