आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांचे कोट्यवधी तर बुडवलेच, पण नीरव मोदीच्या फसवणुकीमुळे या सीईओची एंगेजमेंटही मोडली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओटावा - फरार हिरे व्यापारी नीरव मोदीने केल्या फसवणुकीचा फटका फक्त भारतीय बँकांनाच बसला आहे असे नाही. नुकत्याच समोर आलेल्या एका प्रकरणानुसार नीरव मोदीने केलेल्या फसवणुकीमुळे कॅनडातील एका कंपनीच्या सीईओचा साखरपुडा मोडला आहे. कॅनडाच्या पेमेंट प्रोसेसिंग कंपनीच्या सीईओंची ही फसवणूक याचवर्षी एप्रिल महिन्यात झाली आहे. त्यांनी 2 लाख डॉलर म्हणजे 1.47 कोटींमध्ये हिऱ्याच्या दोन अंगठ्या खरेदी केल्या होत्या. पण त्यातील हिरे नकली होते. कॅनडाचे पॉल अल्फोंसो यांनी गर्लफ्रेंडबरोबर एंगेजमेंटसाठी या अंगठ्या खरेदी केल्या होत्या. पण यातील हिरे खोटे असल्याचे समजल्यानंतर तिने साखरपडा मोडला. 


2012 मध्ये भेटले होते मोदी आणि अल्फोंसो
साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार नीरव आणि अल्फोंसो 2012 मध्ये अमेरिकेत भेटले होते. त्यानंतर दुसऱ्या भेटीत ते एकत्र जेवलेही होते. एप्रिल 2018 मध्ये अल्फोंसोने नीरव मोदीला ई मेलद्वारे साखरपुड्यासाठी खास अंगठीची ऑर्डर गिली. त्याने एक लाख डॉलर (73.95 लाख रुपये) चे बजेट ठरवले होते. पण नीरव मोदीने 3.2 कॅरेटच्या हिऱ्याच्या अंगठीचे बिल 1.20 लाख डॉलर (88.73 लाख) बनवले. 


पहिली अंगठी आवडल्यानंतर अल्फोंसोच्या गर्लफ्रेंडने 2.5 कॅरेट हिऱ्याची दुसरी अंगठी तयार करण्याची ऑर्डर दिली. त्यासाठी 80 हजार डॉलर (59.15 लाख) दिले. नंतर जूनमध्ये अल्फोंसोने दोन्ही अंगठ्यांसह गर्लफ्रेंडला प्रपोज केले आणि त्यांचा साखरपुडा झाला. 

 

अल्फोंसो आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अंगठ्यांचा विमा करायचा होता. पण नीरव मोदीने त्यांना हिऱ्याचे सर्टिफिकेट पाठवलेच नाही. अल्फोंसोने अनेक ईमेल केले. पण नीरव वारंवार टाळत राहिला. दोन महिन्यांपूर्वी ऑगस्टमध्ये अल्फोंसोच्या गर्लफ्रेंडने अंगठ्या तपासून पाहिल्या तर त्या नकली अशल्याची माहिती मिळाली, त्यानंतर अल्फोंसोला नीरव मोदीच्या पीएनबी फ्रॉडबाबत माहिती मिळाली. 


काय म्हणाली गर्लफ्रेंड...
अल्फोंसोने सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड त्याला म्हणाली, तू खूपच हुशार आहेस. तू हिरे चेक न करताच दोन लाख डॉलर दिले. हे माझ्या बुद्धीपलिकडचे आहे. मी तुझ्याबरोबर राहू शकत नाही. 


साखरपुडा मोडल्यानंतर 13 ऑगस्टला नीरव मोदीने ई मेल केला त्यात लिहिले, तुला माहिती नाही तू मला किती त्रास दिला आहेत. तू मला आणि माझ्या एक्स गर्लफ्रेंडला फार दुःख दिले आहे. माझ्या जीवनातील एका खास क्षणाचा तू विचका केलास. अल्फोंसोने आता कॅलिफोर्नियाच्या सुपरियर कोर्टात नीरव मोदीच्या विरोधात 30.66 कोटींच्या नुकसा भरपाईचा दावा केला आहे. त्याची सुनावणी जानेवारी 2019 मध्ये होईल. नीरव मोदी यावर्षी जानेवारीपासून भारतातून फरार होऊन लंडनमध्ये राहत आहे. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...