Home | National | Other State | Engineer and cashier arrested for taking a bribe of 14 lakh in Patna

नोटांच्या गादीवर झोपायचा अभियंता; बेडरुमधील दिवाणाच्या बॉक्समध्ये लपवून ठेवले होते २.३६ कोटी रूपये, पोलिसांनी केली अटक  

दिव्य मराठी नेटवर्क, | Update - Jun 10, 2019, 04:24 PM IST

पाटण्यात १४ लाखांची लाच घेताना अभियंता व रोखपाल अटकेत

  • Engineer and cashier arrested for taking a bribe of 14 lakh in Patna

    पाटणा - बिहारच्या पाटणा शहरात शनिवारी निगराणी ऑपरेशनमध्ये रस्ते निर्माण विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश प्रसाद यास १४ लाखांची लाच घेताना अटक करण्यात आली. तपासात तो पश्चिम पटेल नगरातील त्याच्या घरात तो नोटांच्या बंडलावर झोपत होता, अशी माहिती मिळाली. त्याच्या बेडरुमधील दिवाणाच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेले २.३६ कोटी रूपये सापडले. सर्व रक्कम दोन बॅग, एक झोळी व दोन पोत्यात भरून ठेवलेली होती. सर्व नोटांची बहुतांश बंडल २ हजारांच्या नोटांची होती. अभियंत्यासमवेत रोखपाल शशिभूषणकुमार यास अटक करण्यात आली आहे. दोघांवर निगराणी ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

    अभियंता सुरेश प्रसादने पाटणाजवळ बिहाटा ते बिक्रम दरम्यान तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या करारासाठी 28 लाख रुपयांची लाच मागितली होती. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे 50 टक्के रक्कम देण्यासाठी इंजीनिअरने ठेकेदाराला पटेलनगर येथील आपल्या घरी बोलवले होते. संबंधीत घटनेची मिळाल्यानंतर इंजीनिअरच्या घराजवळ पोलिसांची उपस्थिती होती. पोलिसांनी अभियंता सुरेश प्रसाद आणि रोखपाल शशिभूषण प्रसाद यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले.


    संबंधीत प्रकरणाबाबत माहिती देताना डीएसपी गोपाल पासवान यांनी सांगितले की, साज इंफ्राकाम प्रोजेक्ट लिमिटेडचे ठेकेदार अखिलेश जायसवाल यांच्याकडे बिहाटा ते बिक्रम दरम्यान रस्ता निर्मितीचे काम आहे. या कामाच्या करारासाठी कार्यकारी अभियंताने 28 लाख रुपयांची लाच मागितली होती.

Trending