National Crime / घरमालकाने मोलकरणीला घरातील कुत्रे बाहेर बांधण्यास सांगितले, तिने नकार दिल्यामुळे 7 कुत्र्यांना सोडले तिच्या अंगावर


उपचारासाठी पैसे मागितल्यावर पतिला धमकावले

दिव्य मराठी वेब

Jun 10,2019 05:09:23 PM IST

गुडगांव(हरियाणा)- सुशांत लोक फेज वनमधील एका इंजिनिअरने रागाच्या भरात आपल्या मोलकरणीच्या अंगावर 7 कुत्रे सोडले. या इंजिनिअरचे नाव शरद अग्रवाल असून त्याने घर काम करणाऱ्या मोलकरणीला कुत्र्यांना बांधायला सांगितले होते, पण मोलकरणीला कुत्र्यांची भिती वाटल्यामुळे तिने नकार दिला. त्यामुळे शरदला खूप राग आला आणि त्याने आपले सात कुत्रे मोलकरणीच्या अंगावर सोडले. घरात असलेल्या 7 कुत्र्यांनी तिच्या अत्यंत क्रुरपणे हल्ला केला. यात मोलकरणीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तिला दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालयात रेफर केले आहे. ही घटना 5 जून रोजी घडली होती. पण शनिवारी पीडिताने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी शरद अग्रवालला अटक करण्यात आली. तसेच, पीडीतेच्या पतिने इंजिनिअरकडे पत्नीच्या उपचारासाठी पैसे मागितले असता त्याने धमकावल्याचा आरोप केला आहे.

मध्यप्रदेशचा रहिवासी आहे आरोपी इंजिनिअर
मध्यप्रदेशच्या पन्ना जिल्हातील रहिवासी असणारी पूजा सुशांत लोक-1 सी-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या इंजिनिअर शरद अग्रवालच्या घरी मोलकरीण म्हणून काम करते. घटनेच्या दिवशी पुजा जेव्हा घरकाम करण्यासाठी गेली तेव्हा शरद आपल्या 7 कुत्र्यांसोबत बसला होता. पीडित पुजाला कुत्र्यांची भिती वाटत असल्यामुळे मालकाला कुत्रे बांधायला सांगितले. त्यामुळे शरदला राग आला आणि त्याने कुत्र्यांना तिच्या अंगावर सोडले. त्यानंतर कुत्र्यांनी तिला घेरले आणि अनेक ठिकाणी चावा घेतला.

आरडा-ओरडा करूनही मोलकरणीला वाचवले नाही
पुजावर झालेल्या हल्ल्यामुळे तिने मदतीसाठी आरडा-ओरडा सुरू केला. पण मदत करण्याऐवजी इंजिनिअर तिथेच बसून हसत राहिला. यादरम्यान तिचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या लोकांनी तिचा जीव वाचवला. त्यानंतर आरोपी शरदने पुजाला बळजबरी रिक्क्षात बसवून घरी पाठवले.


उपचारासाठी पैसे मागितल्यावर पतिला धमकावले
पीडितेचा पती रमेशने तिला रूग्णालयात दाखल केले. रमेशने आरोप केला आहे की, जेव्हा तो पत्नीच्या उपचारासाठी पैसे मागण्यासाठी गेला तर शरदने त्याला धमकावले. त्यामुळे पीडितेने शनिवारी सुशांत लोक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

X
COMMENT