आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजीनिअरिंग ग्रॅजुएट चंद्राणी मुर्मू आहेत देशातील सर्वात तरूण खासदार, 2 वेळच्या भाजप खासदाराचा केला पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ओडिशातील इंजीनिअरिंग ग्रॅजुएट चंद्राणी मुर्मू(25 वर्षे 11 महीने) 17व्या लोकसभेतील सगळ्यात तरूण खासदार बनल्या आहेत. त्यांनी राज्यातील आदिवासी बाहुल्य क्योंझर मतदारसंघातून बीजद पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढवली आणि दोन वेळसचे खासदार अनंत नायक यांना 66,203 मतांनी पराभूत केले. चंद्राणी लोकसभेतील आतापर्यंतची सगळ्यात तरूण महिला खासदार बनल्या आहेत. 16 जुलैला त्यांचा 26 वा वाढदिवस आहे. 


चंद्राणी 2017 मध्ये भुवनेश्वरच्या कॉलेजमधून बीटेक केल्यानंतर सरकारी नोकरीची तयारी करत होत्या. मार्चमध्ये काका हरमोहन सोरेन यांनी चंद्राणी यांना निवडणूक लढवण्याबाबत विचारले होते, तेव्हा त्यांनी याला गंभीर्याने घेतले नाही. नोकरीमधून निवृत्त होऊन सामाजिक कार्यात गुंतलेल्या हरमोहन यांना नेहमी वाटायचे की, भाजपच्या उमेदवारासमोर चंद्राणी एक चांगला पर्याय आहे. त्यानंतर त्यांनी बीजदच्या नेत्यांशी संपर्क केला. 1 एप्रिलला चंद्राणी यांना तिकीट मिळाल्याचे स्पष्ट झाले.


युवकांसाठी रोजगार निर्मितीला प्राध्यान्य-चंद्राणी
विजयानंतर चंद्राणी म्हणाल्या की, त्या जिल्ह्यातील विकास आणि खासकरून तरूणांसाठी रोजगार, तसेच महिला आणि आदिवासीयांच्या मुद्द्यांसाठी लढणार. खनिज संपदा विपूल प्रमाणात असूनही क्योंझरमध्ये बेरोजगारी आहे.

 

आतापर्यंत दुष्यंत यांच्या नावावर होता हा रेकॉर्ड
याआधी दुष्यंत चौटाला हे सगळ्यात तरूण खासदार बनले होते. मागील लोकसभेत त्यांचे वय 26 वर्षे होते. ते हरियाणाच्या हिसार मतदारसंघातून कुलदीप बिश्नोई यांना 31 हजार मतांनी हरवून खासदार बनले होते. यानंतर त्यांचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये दाखल करण्यात आले होते.


तेजस्वी सुर्या भाजपेचे सगळ्यात तरूण खासदार
संसदेत यावेळी आधीपेक्षा जास्त तरूण खासदार बनले आहेत. पहिल्यांदाच 76 (14.23%) तरूण खासदार बनले आहेत. 2014 मध्ये यांची संख्या 61 होती. त्याशिवाय 21 ते 40 वर्षांच्यामध्ये 59 खासदार आहेत. बेंगळुरू साउथच्या जागेवरून जिंकलेले तेजस्वी सुर्या(वय28) भाजपेचे सगळ्यात तरूण खासदार आहेत. सुर्या यांनी काँग्रेसच्या बी.के. हरिप्रसाद यांना 3 लाख मतांनी पराभुत केले आहे. 

 

तर दुसरीकडे यावेळेस आधीपेक्षा जास्त सुशिक्षीत खासदार आहेत. यावेळी 225 खासदर हे ग्रॅजुएट आहेत, तर फक्त 7 खादार हे 5 वीपेक्षा कमी शिकलेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...