आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकी, मॅनेजमेंट परीक्षांचे पेपर प्रथमच सॉफ्टवेअरद्वारे मंजूर होणार; पुढील वर्षी सुरुवात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंटचे पेपर आता एका विशेष सॉफ्टवेअरद्वारे मंजूर झाल्यानंतरच फायनल होतील. प्रश्नपत्रिकेत काही गडबड झाली किंवा निश्चित केलेल्या निकषांपेक्षा प्रश्नपत्रिका कमी दर्जेदार असेल तर सॉफ्टवेअर ही चूक पकडणार आहे. पुढील वर्षीपासून ही व्यवस्था सुरू केली जाईल. उत्तरपत्रिका तपासल्यानंतर विद्यार्थ्याने कुठल्या क्षेत्रात सुमार कामगिरी केली याबद्दल हे सॉफ्टवेअर सांगणार आहे. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी काही निकष ठरवले आहेत. त्या आधारावरच उत्तरपत्रिका तपासली जाईल. ही व्यवस्था लागू झाल्यावर रट्टा मारून पेपर लिहिणाऱ्या मुलांची अडचण वाढेल. 

 

सॉफ्टवेअरचा वापर आणि याद्वारे पेपर सेट करण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. यासाठीची पहिली कार्यशाळा ७ डिसेंबरपासून कोचीमध्ये सुरू होत आहे. यात १५० शिक्षक सहभागी होतील. याच पद्धतीने दीड महिन्यात संपूर्ण देशात १५ कार्यशाळा होतील. अडीच हजार शिक्षकांना नवीन पेपर पॅटर्नबद्दल सांगितले जाईल. तंत्र शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शेट्टार कमिटीने हे नवीन पॅटर्न तयार केले आहे. अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे सल्लागार राजीव कुमार म्हणाले की, प्रशिक्षण दिलेले शिक्षक इतर शिक्षकांना हे पॅटर्न समजून सांगतील. दोन ते तीन महिन्यांत सर्व शिक्षकांना प्रशिक्षित केले जाईल. पुढील वर्षी परीक्षा देणाऱ्या १५ लाख विद्यार्थ्यांना नवीन पेपर पॅटर्नची परीक्षा द्यावी लागेल. 

 

४ निकषांवर पेपर तयार होणार; ४६% प्रश्न प्रॅक्टिकलशी संबंधित 
नवीन व्यवस्थेत चार निकषांवर पेपर तयार केला जाईल. यात अॅप्टिट्यूड, व्यावहारिक ज्ञान, मूल्यांकन आणि विश्लेषणाच्या आधारे पेपरमध्ये प्रश्न विचारले जातील. बीटेक, एमटेक आणि एमबीए सारख्या अभ्यासक्रमांत ३६% प्रश्न अॅप्टिट्यूटचे, ४६% प्रश्न व्यावहारिक ज्ञान, प्रत्येकी ९% प्रश्न अनुक्रमे मूल्यांकन व विश्लेषणावर आधारित असतील.

बातम्या आणखी आहेत...