Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Engineering second year addmissions, only 45.84 percent seats are filled

अभियांत्रिकी द्वितीय वर्ष प्रवेश, ४५.८४ टक्केच जागा भरल्या

प्रतिनिधी | Update - Aug 03, 2018, 12:02 PM IST

सर्वात अधिक जागा पसंती ऑर्किड महाविद्यालयाला मिळाली. या महाविद्यालयात ३८८ जागा उपलब्ध होत्या.

  • Engineering second year addmissions, only 45.84 percent seats are filled

    सोलापूर- जिल्ह्यात एकूण १५ पदवी अभियांत्रिकी महाविद्यालये असून त्यात उपलब्ध जागा ४१६२ एवढ्या होत्या. यापैकी सर्वात अधिक जागा पसंती ऑर्किड महाविद्यालयाला मिळाली. या महाविद्यालयात ३८८ जागा उपलब्ध होत्या. त्यातील ७८.२७ टक्के जागा अॅलोटमेंट झाल्या आहेत. हे महाविद्यालय द्वितीय वर्ष थेट प्रवेशाबाबत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर ठरले.


    पहिल्या फेरीमध्ये साधारण ४६ टक्के जागा अलॉट झाल्या. उर्वरित जागा या विविध मागास प्रवर्गातील आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना द्वितीय अथवा तृतीय फेरीमध्ये प्रवेश मिळू शकतो. कारण तिसऱ्या फेरीमध्ये सर्व जागा खुल्या होतात. थेट द्वितीय वर्ष प्रवेश निश्चितीसाठी १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ होती, अशी माहिती एन.के. ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. दफेदार यांनी दिली.


    सोलापूर जिल्ह्यात पंधरा अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत. आॅर्किड महाविद्यालयाने व पंढरपूर येथील स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील ७०.३७ टक्के जागा भरल्या आहेत. याशिवाय वालचंद महाविद्यालयातील ६८.११ टक्के, ए.जी. पाटील ६७.५९ टक्के, व्ही. व्ही. पी. ६१.०५ टक्के व बी.एम.आय.टी. मधील ५१.२४ टक्के जागा भरल्या आहेत.

Trending