आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाने एकाच वेळी खाल्ल्या बीपीच्या 170 गोळ्या, मग जे घडले त्यावर कुणाचाच विश्वास बसेना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आत्महत्या करण्यासाठी लोक कोणकोणती शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. परंतु भोपाळमधून समोर आलेल्या आत्महत्येच्या एका प्रकरणाने लोकांना विचार करायला भाग पाडले आहे. येथील अयोध्या नगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या करण्यासाठी अत्यंत भयानक पद्धतीचा अवलंब केला. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या या तरुणाने एकाचवेळी ब्लडप्रेशरच्या 170 गोळ्या खाल्ल्या, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना मंगळवारची असल्याचे सांगितले जात आहे. मृत तरुणाचे नाव राहुल भार्गव आहे. बन्सल कॉलेजमध्ये बीईचे शिक्षण घेत होता.


मुलाचे वडील त्यांना डेप्युटी कलेक्टर बनवण्यास इच्छुक होते
राहुलचे वडील दिनेश भार्गव शिक्षक आहेत. आपल्या मुलाला कलेक्टर बनवण्याचे ते स्वप्न बघत होते. परंतु राहुल आपल्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करू शकत नव्हता. तो मागील आठ वर्षांपासून इंजिनिअरिंग करत होता परंतु यशस्वी होऊ शकला नाही. यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. पाहता-पाहता त्याला बीपीचा त्रास सुरु झाला आणि यामुळे तो औषधी घेऊ लागला. ब्लडप्रेशरच्या 170 गोळ्या खाल्ल्यानंतर त्याला त्रास सुरु झाला. तब्येत बिघडत असल्याचे पाहून त्याने सोनू जाट नावाच्या त्यांच्या मित्राला मॅसेज केला.


हॉस्पिटलमध्ये स्वतः दिली गोळ्या घेतल्याची माहिती
राहुलला लगेच हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. राहुलने स्वतःचा सांगितले की, त्याने बीपीच्या 170 गोळ्या खाल्ल्या आहेत. राहुलची बोलणे ऐकताच डॉक्टरांनी त्याला हमीदिया हॉस्पिटलमध्ये रेफर केले. परंतु सर्व प्रयत्न करूनही त्याला वाचवणे शक्य झाले नाही. पोलिसांना राहुलची कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी राहुलचा फोन ताब्यात घेतला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...