आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंगाच्या चायना मांजाने इंजिनिअरचा कापला गळा; गंभीर जखमी   

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- दुचाकीने जात असताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आशिष घोगरे यांचा गळा कापला. त्यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना शिवणी- खडकी रोडवर गुरुवारी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. 

 

आशिष घोगरे वय ३१ हे दुचाकीने जात असताना अचानक चायना मांजा त्यांच्या गळ्यात अडकला. मांजा अडकल्याने त्यांनी लगेच दुचाकी थांबवली. मात्र तो पर्यंत श्वसननलिकेपर्यंत त्यांचा गळा चिरत गेला. काही कळण्याच्या आतच सर्व झाल्याने प्रचंड रक्तस्राव सुरु झाल्याने त्यांना तत्काळ विदर्भ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केला. आशिष घोगरे यांच्या गळ्याच्या श्वसननलिकेच्या बाहेरचा भाग चिरल्या गेला. तर मानेतील मसलच्या संबंधित रक्तवाहिन्या व मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ब्रॅन्चेसही कापल्या गेल्या. सुदैवाने मेंदूला रक्तपुरवठा करणारी प्रमुख वाहिनी कापल्या गेली नाही. सध्या त्यांची प्रकृती ठिक असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटलचे डॉ. आनंद मेरकुटे यांनी दिली. 

 

श्वासनलिकेचा थोडा भाग कट झाला 
गळ्यातील मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या ब्रॅन्चेस कापल्या गेल्या. यावेळी भरपूर रक्तस्राव झाला. सध्या रुग्णाची तब्येत ठिक आहे. डॉ.अविनाश तेलगोटे 
 

बातम्या आणखी आहेत...