आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट्स डेस्क - इंग्लंडने वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवला. तसेच पहिल्यांदाच विश्वविजेत्याचा खिताब मिळवला. याबद्दल टीम इंग्लंडला बक्षीसाच्या स्वरुपात 28 कोटी रुपये मिळाले आहेत. तर रनरःअप (उपविजेता) राहिलेल्या न्यूझीलंडच्या टीमला 14 कोटी रुपये देण्यात आले. चॅम्पियन बनल्यानंतर मिळणारी वर्ल्डकपची ट्रॉफी 11 किलो सोने-चांदीने बनलेली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला मालिकावीर तर इंग्लंडच्या बेन स्टोक्सला सामनावीर घोषित करण्यात आले. विल्यमसनने 8 खेळांमध्ये 548 धावा काढल्या. त्याच्या नेतृत्वात न्यूझीलंडचा संघ फायनलपर्यंत पोहोचला. तर स्टोक्सने फायनलमध्ये 85 चेंडूंत 98 धावा काढल्या आहेत.
रोहित नंबर एकचा फलंदाज, स्टार्क बॉलर नंबर वन
रोहित शर्मा या वर्ल्डकपचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 9 सामन्यांत 648 धावा काढल्या. दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे. त्याने 10 इनिंगमध्ये 647 धावा काढल्या. ऑस्ट्रेलियाचाच मिशेल स्टार्क नंबर एकचा गोलंदाज ठरला. त्याने सिरीजमध्ये 27 गडी बाद केले. दुसऱ्या क्रमांकाचा बॉलर मुस्तफिजुर रहमानने 20 विकेट्स घेतल्या आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आर्चरने सुद्धा 20 गडी बाद केले.
वर्ल्ड कप ट्रॉफीचे वजन 11 किलो
वर्ल्ड कपच्या ट्रॉफीचे वजन 11 किलो आहे. ही ट्रॉफी सोने आणि चांदीच्या मिश्रणातून तयार करण्यात आली. 60 सेमी उंट असलेली ही ट्रॉफी तयार करण्यासाठी दोन महिने लागतात. यात एक पृथ्वीगोल सोन्याचा असतो. या पृथ्वीगोलास 3 वाकड्या स्तंभांवर स्थापिक केले जाते. हे तिन्ही स्तंभ स्टम्पच्या आकाराचे असतात. त्यावर बेल सुद्धा लावलेली असते. ही ट्रॉफी पहिल्यांदा 1999 मध्ये बनवण्यात आली होती. खरी ट्रॉफी आयसीसीकडे ठेवली जाते आणि विजेत्या संघाला त्याची प्रतिकृती दिली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.