आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्पोर्ट डेस्क- इंग्लँडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरवर वर्णद्वेषी टीका करणाऱ्या व्यक्तीवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. घटना नोव्हेंबरमध्ये न्यूजीलँडमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात झाली होती. न्यूजीलँड क्रिकेट बोर्डाने ऑकलँडचा रहिवासी असलेल्या व्यक्तीवर कारवाई केली. आता तो व्यक्ती दोन वर्षे न्यूझीलँडमध्ये डोमेस्टीक किंवा आंतरराष्ट्रीय सामना पाहू शकणार नाही.
न्यूजीलँड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ते अँथनी क्रमीने सांगितले की, पोलिसांनी आरोपीला पकडले आहे. त्याला समज देऊन पाठवण्यात आले. आम्ही आर्चर आणि इंग्लँड संघाचे त्या घटनेसाठी माफी मागतो. याप्रकारची घटना कधीच खपवून घेतली जाणार नाही.
आर्चरने ट्वीटमध्ये खुलासा केला होता
ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये इंग्लँड टीमने न्यूजीलँड दौऱ्यार पाच टी-20 आणि दोन टेस्ट सीरीज खेळली होती. सीरीजपूर्वी न्यूजीलँडच्या एका नागरिकांने आर्चरवर वर्णद्वेषी टीका केली होती. आर्चरने ट्वीट करुन या घटनेची माहिती दिली. त्यानंतर न्यूजीलँडचा कर्णधार केन विलियम्सनने या घटनेबद्दल माफी मागितली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.