Home | Sports | From The Field | England scored 180 runs in the second innings

इंग्लंड संघाच्या दुसऱ्या डावात १८० धावा, ईशांतच्या पंचने इंग्लंडला राेखले; भारताची निराशाजनक सुरुवात

वृत्तसंस्था | Update - Aug 04, 2018, 08:04 AM IST

ईशांत शर्मा (५/५१), अार.अश्विन (३/५९) यांनी शानदार गाेलंदाजी करताना पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात यजमान इंग्लंडचा माे

  • England scored 180 runs in the second innings

    बर्मिंगहॅम- ईशांत शर्मा (५/५१), अार.अश्विन (३/५९) यांनी शानदार गाेलंदाजी करताना पहिल्या कसाेटीच्या दुसऱ्या डावात यजमान इंग्लंडचा माेठ्या खेळीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यांनी इंग्लंडला शुक्रवारी दुसऱ्या डावात १८० धावांवर राेखले. यातून इंग्लंड संघाकडे अाता १९३ धावांची अाघाडी अाली अाहे. यादरम्यान एकाकी झुंज देत इंग्लंडच्या २० वर्षीय सॅम कुरनने (६३) शानदार अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरात भारताची दुसऱ्या डावात चांगलीच दाणादाण उडाली. भारताने तिसऱ्या दिवसअखेर ५ गड्यांच्या माेबदल्यात ११० धावा काढल्या. काेहलीने (नाबाद ४३) संयमी खेळीच्या बळावर संघाचा डाव सावरला. अाता ८४ धावांनी पिछाडीवर असलेल्या भारताकडे ५ विकेट अाहेत.


    इंग्लंड संघाने कालच्या १ बाद ९ धावांवरून तिसऱ्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली. दरम्यान, जेग्निसचा माेठ्या खेळीचा प्रयत्न फसला. त्याला अश्विनने सामन्यात लाेकेश राहुलकरवी झेलबाद केले. यातून जेग्निस ८ धावांचे याेगदान देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार ज्याे रुट (१४) अाणि बेन स्टाेक्स (६) यांना समाधानकारक कामगिरी करता अाली नाही.


    एका षटकात तीन बळी
    ईशांतने ५ बळी घेतले. त्याने एकाच षटकात तीन बळी घेतले. त्याने ३१ व्या षटकात दुसऱ्या चेंडूवर बेयरस्ट्राे, चाैथ्या चेंडूवर स्टाेक्स व सहाव्या चेंडूवर बटलरला बाद केले. मलान व ब्राॅडलाही बाद केले.

Trending