आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड संघ सलग पाचव्यांदा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत; दक्षिण अाफ्रिकेसह उपांत्य फेरीचे तीन संघ निश्चित

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भारतीय संघासमोर असेल इंग्लंडचे आव्हान

सिडनी- विजयी मोहीम कायम ठेवताना इंग्लंड संघाने रविवारी महिलांच्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा पल्ला गाठला. इंग्लंडचा महिला संघ सलग पाचव्यांदा वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये दाखल झाला. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघानेही शानदार विजयासह अंतिम चारमधील प्रवेश निश्चित केला. यासह आता विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील तीन संघ निश्चित झाले आहेत. आता आज सोमवारी चाैथा संघ ठरणार आहे.


यासाठी यजमान आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघांत सामना होणार आहे. यातील विजेत्या संघाला सेमीफायनलचे तिकीट मिळणार आहे.  इंग्लंडच्या महिला संघाने रविवारी विंडीजवर ४६ धावांनी मात केली.  यासह इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीतील प्रवेशास पात्र ठरला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४३ धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात विंडीजच्या संघाला १७१. षटकांत अवघ्या ९७ धावांवर गाशा गंुडाळावा लागला.

भारतीय संघासमोर असेल इंग्लंडचे आव्हान

तीन वेळच्या सेमीफायनलिस्ट भारताचा उपांत्य सामना आता इंग्लंडशी होण्याची शक्यता आहे. भारतीय संघ अ गटात अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने गटात अव्वल स्थानावर धडक मारली. अशात हे दोन्ही संघ समोरासमोर असतील. आफ्रिकेच्या संघाने तीन सामन्यात सहा गुणांची कमाई केली. इंग्लंडचे चार सामन्यात सहा गुण आहेत. मात्र, रनरेटच्या आधारे इंग्लंडला ब गटात अव्वल स्थान गाठता आले.
 

बातम्या आणखी आहेत...