आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

WorldCup2019/ विश्वचषकातील पहिला सामना आज इंग्लंड-अफ्रीका यांच्यात होणार, आपल्या घरच्या मैदानत मागील 1 वर्षात 13 पैकी 11 वेळेस मिळवला आहे विजय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क- एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण अफ्रीका यांच्यात गुरुवारी म्हणजेच आज लंडनच्या ओवलमध्ये खेळला जाणार आहे. यावेळी इंग्लंडची टीम विश्वचषकातील प्रमुख दावेदार मानली जात आहे. मागील एक वर्षाचा लेखा-जोखा सांगायचा झाला तर, 25 सामने इंग्लडने खेळले आहेत आणि त्यापैकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे. 5 सामन्यात पराभव झाला तर 3 सामने ड्रा झाले आहेत. यात त्यांनी आपल्या घरच्या मैदानात 13 सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 11 सामन्यात विजय मिलवला आहे.

 

दक्षिण अफ्रीकेचाही रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्यांनी मागील एक वर्षात 21 पैकी 16 सामन्यात विजय मिळवला, तर 5 सामन्यात पराभव झाला आहे. यादरम्यान परदेशत त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहीला आहे. परदेशात त्यांनी 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत. 


ओवलमध्ये दक्षिण अफ्रीकेने 9 पैकी 3 सामने जिंकले
दक्षिण अफ्रीकेने ओवलमध्ये आतापर्यंत 9 वनडे सामने खेळले आहेत आणि त्यापैकी 3 मध्ये विजय मिळवला आहे. दक्षिण अफ्रीकेने आतापर्यंत विश्वचषकाचा एकच सामना 22 मे 1999 मध्ये ओवलमध्ये खेळला आहे. त्यावेळी अफ्रीकेने इंग्लडला 122 रनाने रहवले होते.


धावपट्टी कशी आहे ?
विश्वचषकातील पहिल्या सामन्यादरम्यान थोडेसे ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हल्का पाऊसदेखील होऊ शकतो. त्यामुळे गोलंदाजांना नेहमीपेक्षा कमी स्विंग मिळण्याची शक्यता आहे. टॉस जिंकलेल्या टीमने गोलंदाजी निवडण्याची शक्यता जास्त आहे. या मैदानावर मागील 5 पैकी 3 सामन्यात 300 पेक्षा जास्त रन्स बनवण्यात आले आहेत.


दोन्ही टीम्स
इंग्लंड-
इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (विकेटकीपर), मोइन अली, क्रिस वोक्स, लियम प्लंकेट, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, टॉम करन, मार्क वुड, जेम्स विंस, लियम डॉसनय

 

दक्षिण अफ्रीका-  फाफ डुप्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, क्विंटन डीकॉक (विकेटकीपर), रसी वान डर डुसेन, जेपी डुमिनी, डेविड मिलर, एंडिले फेहलुकवायो, ड्वाइन प्रीटोरियस, कगिसो रबाडा, लुंगी एंगिडी, इमरान ताहिर, एडेन मार्कराम, तबरेज शम्सी, क्रिस मॉरिस.