आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • England Will Be Separated From The European Union After 47 Years, EU Parliament Approves The Agreement

इंग्लंड 47 वर्षांनी युरोपियन युनियनमधून वेगळा होईल, ईयू संसदेने करारास दिली मंजुरी; इंग्लंडला दरवर्षी 53 हजार कोटींचे नुकसान होईल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : इंग्लंडचा युरोपियन युनियन (ईयू)मधून बाहेर पडण्याचा संघर्ष शुक्रवारी संपेल. ईयू संसदेने बुधवारी ब्रेक्झिट कराराला मंजुरी दिली. या अंतर्गत इंग्लंड ३१ जानेवारीला रात्री ११ वाजता (स्थानिक वेळेनुसार) युरोपीय संघातून वेगळा होईल. चार वर्षे चाललेल्या ओढाताणानंतर बुधवारी ईयू संसदेने ४९ विरुद्ध ६२१ मतांनी ब्रेक्झिट करारावर शिक्कामोर्तब केले. या कराराला इंग्लंडचे पीएम बाेरिस जॉन्सन यांनी २०१९ च्या शेवटी ईयूच्या २७ नेत्यांसोबत चर्चा करत अंतिम रुप दिले होते. इंग्लंडने जून २०१६ मध्ये झालेल्या जनमत चाचणीत ब्रेक्झिटला मंजुरी दिली होती. मात्र, इंग्लंड २०२० च्या अखेरपर्यंत ईयूच्या अर्थव्यवस्थेत कायम राहील. मात्र, त्यांच्या धोरणात्मक प्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. तो ईयूचा सदस्यही नसणार.

काय आहे ब्रेक्झिट


इंग्लंडच्या ईयूतून बाहेर होण्यास ब्रेक्झिट म्हटले जाते. ईयूमध्ये २८ युरोपिय देशांची आर्थिक आणि राजकिय भागीदारी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आर्थिक सहकार्य वाढवण्यासाठी ईयूची स्थापना झाली होती. जे देश अापसात व्यापार करतील ते आपसात युद्ध करणार नाहीत, असा विचार होता. ईयूची स्वत:चे चलन युरो आहे. १९ सदस्य देश त्याचा वापर करतात. इंग्लंड १९७३ मध्ये ईयूत सहभागी झाला होता.

गरज का


इंग्लंडचे युरोपियन युनियनमध्ये जास्त चाललेच नाही. त्या उलट इंग्लंडच्या लोकांच्या आयुष्यावर ईयूचे जास्त नियंत्रण आहे. ते व्यापारासाठी इंग्लंडवर अनेक अटी लादतात. इंग्लंडच्या राजकिय पक्षांना वाटते की, अब्जो पाउंड वार्षिक सदस्यत्व शुल्क दिल्यानंतरही इंग्लंडला त्यांचा जास्त फायदा होत नाही. यामुळे बेक्झिटची मागणी करण्यात आली.

पारंपरिक गाण्यांनी निरोप

ईयूच्या संसदेत ब्रेक्झिटसाठीच्या मतदानादरम्यान भावनिक वातावरण होते. मतदानानंतर खासदारांनी इंग्लंडसाठी पारंपरिक गाणे म्हटले. ईयूचे अध्यक्ष उर्सुला वॉन यांनी इंग्लंडचे प्रख्यात लेखक जॉर्ज इलियटचे काव्य सादर करत म्हटले, वेगळ्या होण्याच्या दु:खातच आम्ही आपल्या प्रेमाची खोली पाहतो. इंग्लंडच्या खासदारांनी सांगितले की, आम्ही या संघात परत येऊ. लाँग लिव्ह युरोप... तर काही ठिकाणी ब्रेक्झिट पूर्ण झाल्याचा अंदाज दिसला.

  • ब्रेक्झिटचा परिणाम...

इंग्लंड वर: व्यक्तीमागे ६८ हजारांंचा भार

ब्रेक्झिटमुळे इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला दरवर्षी ५३ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. जर्मनीचे बॅर्टेल्समन फाउंडेशनच्या ताज्या अभ्यासात म्हटले आहे की, ईयूतून बाहेर झाल्याने इंग्लंडमध्ये वस्तू आणि सेवांवर कर लागेल. जो सध्या एकल बाजार व्यवस्थेमुळे लागत नव्हता. यामुळे वस्तू आणि सेवा महागतील आणि लाखो लोकांचा खर्चही वाढेल. तर उत्पन्न कमी होण्याचा अंदाज आहे. यामुळे इंग्लंडच्या लोकांच्या उत्पन्नात ४५ हजार कोटी रुपयांचे नुकसान होईल. याचा भार इंग्लंडवासींवर प्रत्येक व्यक्तीमागे ६८ हजार रुपये पडेल.

जगावर: जर्मनी-फ्रान्सची जीडीपी वाढेल

इंग्लंड वेगळे झाल्याने युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होईल. सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत ईयूची हिस्सेदारी २२% आहे. इंग्लंड गेल्यानंतर १८% राहिल. ईयूच्या लोकसंख्येतही १३% घट होईल. तर ईयूमध्ये जर्मनीची जीडीपी २०% ने वाढून २५% तर फ्रान्सची १५ वरुन १८% होईल. अमेरिकाही फायद्यात राहिल. इंग्लंड ईयूच्या अर्थव्यवस्थेत १.५० लाख कोटी रुपयांचे योगदान देतो. ईयू आता इंग्लंडला सवलतीही देणार नाही.

भारतावर: मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल

भारत इंग्लंडमध्ये गुंतवणूक करणारा तिसरा मोठा देश आहे. इंग्लंडमध्ये ८०० पेक्षा जास्त भारतीय कंपन्या आहेत. ज्या १.१० लाख लोकांना रोजगार देतात. पाउंड घसरल्याने नफ्यावर परिणाम हाेईल.

युरोपने नवे नियम बनवले तर भारतीय कंपन्यांना नवे करार करावे लागतील. यामुळे खर्च वाढेल व वेगवेगळ्या देशांमधील नियमांचा सामना करावा लागेल.


भारत इंग्लंडसोबत मुक्त व्यापार करार करू शकताे. यामुळे भारताची निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. ईयूसोबत यावर संमती झाली नव्हती.


इंग्लंड मध्यवर्ती बाजार आहे. पोर्तगीज, ग्रीक सारखे देश तेथून साहित्य घेतात. इंग्लंडशी एफटीए झाल्याने भारताला मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल.