Home | Sports | From The Field | England's 154 runs lead

टीम इंडियाचा उडाला धुव्वा; इंग्लंड संघाची १५४ धावांची अाघाडी, कुकच्या ४६ धावा

वृत्तसंस्था | Update - Sep 10, 2018, 08:37 AM IST

विजयी चाैकारासाठी उत्सुक असलेेल्या यजमान इंग्लंड संघाने अाता पाहुण्या भारतविरुद्ध पाचव्या कसाेटीवर मजबुत पकड घेतली. कुक

  • England's 154 runs lead

    लंडन- विजयी चाैकारासाठी उत्सुक असलेेल्या यजमान इंग्लंड संघाने अाता पाहुण्या भारतविरुद्ध पाचव्या कसाेटीवर मजबुत पकड घेतली. कुक (नाबाद ४६) अाणि ज्याे रुटच्या (नाबाद २९) शानदार खेळीच्या बळावर इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ितसऱ्या दिवसअखेर २ बाद ११४ धावा काढल्या. यासह यजमान इंग्लंडने १५४ धावांची अाघाडी घेतली. यात पहिल्या डावातील २० धावांच्या अाघाडीचा समावेश अाहे.


    इंग्लंडने पहिल्या डावात ३३२ धावांचा डाेंगर रचला. याच्याच प्रत्युत्तरात पाहुण्या टीम इंडियाची पहिल्या डावात चांगलीच दमछाक झाली. यातून भारतीय संघाचा तिसऱ्या दिवशी पहिल्या डावात धुव्वा उडला. भारताने पहिल्या डावात २९२ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून हनुभा विहारीने (५६)पदार्पणात शानदार अर्धशतक ठाेकले.


    जडेजाचा झंझावात
    भारताच्या रवींद्र जडेजाने झंझावाती अर्धशतक झळकावले. त्याने १५६ चेंडूंचा सामना करताना ११ चाैकार अाणि एका षटकाराच्या अाधारे नाबाद ८६ धावांची खेळी केली.

Trending