आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंड संघाची चौथ्यांदा विजयी सलामी, दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी मात, आर्चरने घेतल्या तीन विकेट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओव्हल-यजमान इंग्लंड संघाने आपल्या घरच्या मैदानावर विश्वविजेता होण्याच्या आपल्या मोहिमेला दमदार सुरुवात केली. यजमान इंग्लंडने सलामीच्या सामन्यात गुरुवारी दक्षिण आफ्रिकेवर १०४ धावांनी मात केली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना  ८ बाद ३११ धावा काढल्या.  प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा ३९.५ षटकांत अवघ्या २०७ धावांवर खुर्दा उडवला.  यासह इंग्लंडने स्पर्धेत विजयी सलामी दिली. 


इंग्लंडने सलग पाच वनडे सामन्यांत ३०० पेक्षा अधिक स्कोअर नोंदवण्याचा पराक्रम गाजवला. बेन स्टोक्सने सर्वाधिक ८९ धावांची खेळी केली. तसेच विश्वचषकात पहिल्यांदा इंग्लंड संघातील चार फलंदाजांनी ५० पेक्षा अधिक धावांची खेळी केली. 
 
 
आफ्रिकेडून फिरकीपटू इम्रान ताहिरने सलामी सामन्यात विक्रमाला गवसणी घातली. पहिल्याच षटकात विकेट घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. त्याने वर्ल्डकपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी कामगिरी नोंदवली. यापूर्वी १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज क्रेग मॅक्डरमॉटने पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडच्या राइटला बाद केले होते.

 

२० ते पासून ३० व्या षटकांत आफ्रिकेच्या गोलंदाजांना इंग्लंडचा एकही बळी घेता आला नाही.  
चौथ्या षटकांत आमला हा जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट होऊन परतला. 
पहिल्या १० षटकांत टीमने ४४ धावा काढल्या व २ बळी गमावले. 
दक्षिण आफ्रिकेने २३ ते २७ व्या षटकांच्या दरम्यान २१ चेंडूंच्या फरकाने तीन विकेट गमावल्या. 


दक्षिण आफ्रिकेचा इम्रान ताहिर वर्ल्डकपच्या सामन्यात पहिले षटक टाकणारा पहिला स्पिनर ठरला. 
वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदा पहिल्या षटकात विकेट पडली. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियाने असे केले. आता ताहिरने दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर बैयरस्ट्रोला बाद केले. 


इयान मोर्गन २०० वनडे खेळणारा इंग्लंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला. तो  ६०००+धावा काढणारा एकमेव इंग्लिश फलंदाज ठरला आहे. 

इंग्लंड                                          धावा     चेंडू      ४    ६
रॉय झे. डुप्लेसिस गो. फेहलुकोवायो    ५४        ५३    ०८    ०
जॉनी बैयरस्ट्रो झे. डिकॉक गो. इम्रान   ००        ०१    ००    ०
ज्यो रुट झे. ड्युमिनी गो. रबाडा           ५१    ५९      ०५     ०
इयान मोर्गन झे. मार्कराम गो. इम्रान    ५७    ६०    ०४       ३
बेन स्टोक्स झे. आमला  गो.एनगिडी    ८९    ७९    ०९       ०
जोस बटलर त्रि.गो. एनगिडी                १८    १६    ००       ०
मोईन अली झे. डुप्लेसिस झे. एनगिडी    ०३    ०९    ००     ०
क्रिस वोक्स झे. डुप्लेसिस गो. रबाडा      १३    १४    ०१      ०


लाईम प्लकेंट नाबाद    ०९    ०६    ०१    ०
जोफ्रा आर्चर नाबाद    ०७    ०३    ०१    ०


अवांतर : १०. एकूण : ५० षटकांत ८ बाद ३११  धावा.   गोलंदाजी : इम्रान  १०-०-६१-२, एनगिडी १०-०-६६-३,

रबाडा १०-०-६६-२,  प्रिटोरियस ७-०-४२-०, फेहलुकोवायो ८-०-४४-१, ड्युमिनी २-०-१४-०, मार्कराम ३-०-१६-०.   


दक्षिण आफ्रिका                               धावा     चेंडू     ४    ६
क्विंटन डिकॉक झे. रुट गो. प्लंकेट       ६८    ७४    ०६    २
हाशिम आमला झे. बटलर गो. प्लंकेट    १३    २३    ०१    ०
मार्कराम झे. रुट गो. जोफ्रा आर्चर          ११    १२    ०२    ०
डुप्लेसिस झे. मोईन गो. जोफ्रा आर्चर     ०५    ०७    ०१    ०
डुस्सेन झे. मोईन गो. जोफ्रा आर्चर         ५०    ६१    ०४    १
ड्युमिनी झे. स्टोक्स गो.मोईन अली       ०८    ११    ०१    ०
प्रिटोरियस धावबाद (स्टोक्स/मॉर्गन)       ०१    ०१    ००    ०
फेहलुकोवायो झे. स्टोक्स गो. रशिद        २४    २५    ०४    ०
रबाडा झे. प्लंकेट गो. स्टोक्स                ११    १९    ०२    ०


एनगिडी नाबाद    ०६    ०५    ००    ०
इम्रान ताहीर नाबाद    ००    ०१    ००    ०


अवांतर : १०. एकूण : ३९.५ षटकांत सर्वबाद २०७ धावा.  गडी बाद होण्याचा क्रम : १-३६, २-४४, ३-१२९, ४-१४२, ५-१४४, ६-१६७, ७-१८०, ८-१९३, ९-२०७, १०-२०७ गोलंदाजी :  क्रिस वोक्स ५-०-२४-०, जोफ्रा आर्चर ७-१-२७-३,

आदिल रशिद ८-०-३५-१, मोईन अली १०-०-६३-१, प्लंकेट ७-०-३७-२,  बेन स्टोक्स २.५-०-१२-२.
सामनावीर : बेन स्टोक्स 

 

चार अर्धशतके

यजमान इंग्लंडच्या चार फलंदाजांनी सलामीच्या सामन्यात आपल्या घरच्या मैदानावर शानदार अर्धशतकी खेळी केली. यामुळे इंग्लंडच्या टीमने पहिल्यांदाच वर्ल्डकप सामन्यात चार अर्धशतकी खेळीच्या कामगिरीतून विक्रमाची नोंद केली.