आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अॅलेस्टर कुकची Retirement ची घोषणा; भारताविरुद्ध ओवल टेस्ट ठरणार शेवटचा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - इंग्लंडचा धडाकेबाज क्रिकेटर अॅलेस्टर कुकने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भारत विरुद्ध इंग्लंडचा ओव्हल येथील टेस्ट सामना त्याचा शेवटचा सामना ठरणार आहे. 33 वर्षीय कुकने टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत सहावे स्थान मिळवले आहे. याचवर्षी 9 टेस्टमध्ये त्याने 18.62 च्या सरासरीसह एकूण 298 धावा काढल्या आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये वाइट प्रदर्शन पाहता त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच एका इंग्लिश क्रिकेटरचा सरासरी 45 धावांखाली घसरला आहे. कुकने मार्च 2006 मध्ये नागपूर येथे भारतीय संघाविरुद्ध टेस्ट डेब्यू केला होता. आता शेवटचा सामना सुद्धा तो भारताच्या विरोधातच खेळणार आहे. 
 
गेल्या 8 वर्षांपासून वाइट फॉर्ममध्ये कुक...
कुकने आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये शतक ठोकले होते. त्याने आपल्या करिअरच्या पहिल्या बॅटिंगमध्ये 60 आणि दुसऱ्यांदा 104 धावा काढल्या होत्या. आतापर्यंत 160 टेस्ट सामन्यांत त्याने 12,254 धावा काढल्या आहेत. 294 धावा त्याचा ऑल टाइम बेस्ट स्कोर आहे. कुकने 2018 मध्ये केवळ एकच अर्धशतक लावला. 2010 नंतर त्याचा फॉर्म बिघडला. गेल्या 4 टेस्टमध्ये त्याने अवघ्या 30 धावांचा आकडा सुद्धा पार केला नाही. मार्च 2006 पासून कुकने फक्त एक सामना इंग्लंडसोबत खेळलेला नाही. तो सामना 2006 मध्ये मुंबईत झाला होता. यानंतर त्याने सलग 158 टेस्ट सामने खेळले.
बातम्या आणखी आहेत...