आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रबोधनकारी मीराबाई उमप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारुडात असलेल्या या गारुडाची ताकद एकनाथांनी ओळखलेली होती. म्हणूनच समाजप्रबोधनासाठी कीर्तनाऐवजी त्यांनी या कलाप्रकाराला जवळ केलं. नाथांना समाज-मनाची नस कळलेली होती. म्हणूनच अलुतेदार-बलुतेदारांसह साऱ्यांना सामावून घेत त्यांनी भारुडं रचली. नाथांच्या भारुडांचं वैशिष्ट्य म्हणजे ती लिहिताना त्यांनी शैलीही बहुजन समाजाला जवळची अशीच निवडली. लहानग्या मीराबाईला या भारूंडांचा खुप लळा. तिची आवड लक्षात घेऊन नाथांनी आपल्याकडची खंजिरी मिरेला दिली आणि तुकडोजी महाराजांच्या आशीर्वादाने गावगाड्याबाहेरच्या कलेचा उत्कर्ष झाला. नाथांनी लोकगायकीचे कुबेरासारखे धन मीराबाईंच्या पदरात टाकले. भारूड, आख्यान, पोवाडा हे सारे मीराबाई भराभर गात सुटली... उभ्या महाराष्ट्रात प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या मीराबाईंचा जन्म मातंग समाजातील वामनराव उमप यांच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या एका सामान्य कुटुंबात अंतरवली (ता. गेवराई, जि. बीड) येथे झाला. घरात सात पिढ्यांचा गायन-वादनाचा वारसा. तो वामनरावांपर्यंत आला. वामनराव आणि त्यांची पत्नी रेशमाबाई हे दोघेही गाणे-बजावणे करून कुटुंबाची उपजीविका करायचे. वामनरावांप्रमाणेच रेशमाबाईचा गळा गोड. गाणे-बजावणे करून पोटाची खळगी भरण्यासाठी भिक्षापात्र हातात घेऊन त्यांची भटकंती सुरू असे. परिस्थितीच्या रेट्यामुळे मीराबाईंचं गाणं सुरू झालं. आजही वयाच्या ६०व्या वर्षी महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत, गावगाड्यांत मीराबाई दिमडीवरचं भारूड करत फिरते. फक्त पारंपरिक नाही, तर आधुनिक काळात, समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना आपल्या गायकीच्या माध्यमातून वाचा फोडते. हुंडाबंदी, दारूबंदी, स्त्री-भ्रूणहत्या, एड्स यांसारख्या समस्यांवर भारूड-भजनाच्या माध्यमातून भजन करू लागते. मीराबाईंच्या या प्रबोधनकारी धाटणीमुळे आणि वैचारिक लोकगायकीमुळे आज ती लोकांच्या गळ्यातला ताईत बनत चालली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, लक्ष्मीबाई कोल्हापूरकर पुरस्कार, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्याचा राज्य पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी मीराबाईंना गौरवण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...